
पुणे – उपचारासाठी आवश्यक असलेली आगाऊ रक्कम न भरल्याने रुग्णाला रुग्णालयात भरती करून घेण्यास विलंब झाला. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून महापालिकेचे साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. नातेवाइकांनी संबंधित रुग्णालय आणि आधुनिक वैद्य यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. रुग्णावर वैद्यकीय पथकाने तातडीने आवश्यक उपचार चालू केले होते, असा दावा रुग्णालयाने केला असून नातेवाइकांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत, तसेच सर्व उपचार वैद्यकीय नियमानुसार केले असून प्रकृतीविषयी नातेवाइकांना वेळोवेळी माहितीही दिली होती, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
आरोपीवर वर्ष २०२० मध्ये हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया याच रुग्णालयात झाली होती. त्या नियमित तपासणीसाठी येत होत्या; मात्र पैसे भरल्याविना रुग्णालयात भरती करून घेण्यास रुग्णालयाने नकार दिला. पैशांअभावी उपचारात विलंब झाल्याने आईचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या मुलीने केला आहे.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !