सांगली येथे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता !

कृष्णा नदी

सांगली – कृष्णा, कोयना आणि वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पावसाच्या चालू असलेल्या संततधारेमुळे येथील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिक यांनी अत्यंत सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.वेळोवेळी मिळणार्‍या अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी केले आहे.

नागरिकांना अधिक माहिती किंवा साहाय्यासाठी प्रशासनाने ०२३३-२३०१८२० आणि २३०२९२५ हे पूर नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक लागू केले आहेत.