आंध्रप्रदेश : समाजकंटकाने शिवलिंगाच्या समोरील दीपाने सिगारेट पेटवली !

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान करण्याचा प्रयत्न !

कर्नूल (आंध्रप्रदेश)  – भक्ती आणि श्रद्धा यांचे केंद्र असलेल्या मंदिरात काही समाजकंटकांनी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना कर्नूल जिल्ह्यातील आदोनी येथे घडली आहे. येथील प्रसिद्ध संतान अंजनेय स्वामी मंदिराच्या जवळ असलेल्या शिवमंदिरातील शिवलिंगासमोर एका समाजकंटकाने तेथे प्रज्वलित असलेल्या दीपाने सिगारेट पेटवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

(ही छायाचित्रे, व्हिडिओ देण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

१. वड्डे इरण्णा नावाच्या व्यक्तीने शिवमंदिरात प्रवेश केला आणि गाभार्‍यासमोर असलेल्या पवित्र दीपाने सिगारेट पेटवली. त्यानंतर त्याने मंदिराच्या परिसरात असभ्य वर्तन केले. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी हे संपूर्ण कृत्य भ्रमणभाषमध्ये चित्रित केले आणि सामाजिक माध्यमावर प्रसारित केले.

२. ही घटना समजताच स्थानिक हिंदु संघटनांनी आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त केला.  मंदिराचे पावित्र्य भंग करणार्‍या इरण्णा आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

३. आरोपींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे; मात्र पोलिसांनी अद्याप कुठलीही अधिकृत कारवाई केलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंना लहानपणापासूनच धर्मशिक्षण दिले असते, तर हिंदु धर्मात असे समाजकंटक निपजले नसते ! अशा घटना हिंदूंना अध्यात्म आणि साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करतात !