युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !

हिंदु संघटनांची आंदोलनाद्वारे जोरदार मागणी

– प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देतांना महिला, हिंदुत्वनिष्ठ
प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत असून महिला आणि युवती यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीनंतर इचलकरंजी येथे सलग २ आठवड्यांत ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने संमत केलेला ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ कोणताही विलंब न लावता तात्काळ लागू करून त्याची प्रभावी कार्यवाही करावी, या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समिती, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दल आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने ६ जुलैला जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मोर्चा काढून नायब तहसीलदार संजय काटकर यांना, तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शरद नेमाणे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी इचलकरंजी महापालिकेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. रूपाली सातपुते, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रसाद जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘स्वामी समर्थ केंद्रा’च्या सौ. मीना माने, ‘ओजस्विनी वाहिनी’च्या हर्षदा शेखावत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

या वेळी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा विशेष संपर्कप्रमुख श्री. संतोष हत्तीकर, श्री. संतोष पाटील, सर्वश्री दत्तात्रय पाटील, मनोहर म्हेत्रे, संतोष कांदेकर, अनिकेत तानुगडे, अशोक पुरोहित, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मंगेश मस्कर, श्री. चंद्रकांत जासूद, श्री. विनोद ओझा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हातकणंगले येथेही निवेदन

प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ

हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) – युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातकणंगले येथे निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.          याप्रसंगी भाजपचे ग्रामीण जिल्हा सदस्य श्री. पंकज बुठ्ठे, ‘ओबीसी सेल’चे उपाध्यक्ष श्री. रावसाहेब शिंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. भावेश पटेल, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे श्री. शिवाजी हांडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. अजित देवमोरे, शिवसेनेचे श्री. सचिन देवमोरे, आर्य समाज पुरोहित श्री. महेश पाटील, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. किरण गुरव, श्री. महेश सावंत, श्री. शंकर बंडगर, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. सागर सुतार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर आणि श्री. किरण दुसे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्त्यांना हे लक्षात येत नाही का ?