हिंदु मंदिरे भक्तांच्याच स्वाधीन हवीत !

श्रीराममंदिराच्या दानपेटीतील रकमेची चोरी झाल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे ‘हे असे कसे झाले’ किंवा ‘असे व्हायला नको होते’, असे विचार अनेक जणांच्या मनात येऊ शकतात; मात्र आता या प्रकरणी कर्मफलन्याय आणि संबंधितांचे प्रारब्ध यांच्याप्रमाणे रामाच्या दरबारात हिशोब होईलच ! अटक झाली, म्हणजे कुणी आरोपी असेलच, असे म्हणता येत नाही. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी आहेत, असे जर गृहीत धरले, तर ‘संबंधितांना धर्मशिक्षण मिळालेले नाही, तसेच त्यांची ईश्वरप्राप्तीसाठी साधनाही नाही’, असेच म्हणावे लागेल. साधनेचे वा धर्माविषयीचे दृष्टीकोन स्पष्ट नसल्याने ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्धः।’, म्हणजे ‘द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो’, याप्रमाणे समोर पैसा दिसल्यानंतर व्यक्तीला लोभ वा मोह होऊ शकतो. त्यांच्यामुळे चुकीची कृती होऊ शकते. त्यानंतर अधिक पैसे मिळवणे, म्हणजे अधिक विचार, अधिक माया असा त्याचा प्रवास चालू होतो आणि तो पुन्हा अडकतो. साधना करणार्‍या साधकाला किंवा भक्ताला कर्मफलन्याय अन् क्रियमाण कर्म यांविषयी जाण असते. त्यामुळे त्याच्या हातून असे दृष्कृत्य होऊ शकत नाही. त्यामुळे मंदिरे ही भक्तांच्याच स्वाधीन करायला हवीत !

आता या घटनेमुळे बिळात लपलेले अनेक पुरो(अधो)गामी बाहेर येऊन चर्चा करतील; मात्र ‘एकाही सरकारी खात्याचा कारभार योग्य चालत नसतांनाही सरकार मात्र हिंदूंची मंदिरे स्वतःच्या कह्यात घेते किंवा सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान वा ख्रिस्ती यांच्या काळ्या कृत्यावर मात्र यांची दातखिळी बसलेली असते, हेही तितकेच नक्की !

– श्री. संतोष गांधी, फोंडा, गोवा.