‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना पाशा पटेल

देहली – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘पर्यावरण-संतुलित विकास कृती दला’चे कार्यकारी अध्यक्ष आणि ‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल यांना नवी दिल्ली येथे आयोजित १७ व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये प्रतिष्ठित ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ (कृषी नेतृत्व पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्र, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांमधील पटेल यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद घेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.