‘ज्येष्ठ पौर्णिमा (२९.६.२०२६) या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत) यांचा वाढदिवस आहे. पू. (सौ.) संगीता जाधव मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील धर्मप्रचारक संत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लक्षात आलेले दैवी गुण येथे दिले आहेत.
पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांच्या चरणी त्यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. प्रेमभाव
‘पू. (सौ.) संगीता जाधव त्यांच्या गावी अकलूज येथे जातात. तेथून सेवाकेंद्रात येतांना त्यांच्या शेतातील फळे (उदा. पेरू, केळी, आंबे) घेऊन येतात. त्यांच्या शेतातील ही फळे अत्यंत मधुर असतात. त्या पुष्कळ फळे आणतात. त्यामुळे ठाणे सेवाकेंद्रातील सर्व साधक अनेक दिवस त्या फळांचा आस्वाद घेतात.
२. ‘साधकाच्या सदनिकेतील वस्तूंची काळजी कशी घ्यावी ?’, हे प्रेमाने शिकवणार्या पू. (सौ.) संगीता जाधव !
मे २०२६ मध्ये मुंबईतील एका सेवेनिमित्त वरळी, येथील श्री. नंदकुमार कोतवाल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८६ वर्षे) यांच्या सदनिकेत काही कालावधीसाठी आम्ही रहात होतो. अनेक वर्षांपासून कोतवालकाकांनी त्या सदनिकेतील सर्व वस्तूंची योग्य निगा राखली आहे. त्या वेळी तेथील ‘कार्पेट’, ‘फर्निचर’ इत्यादी सर्व वस्तूंची काळजी कशी घ्यावी ?’, हे पू. काकूंनी आम्हाला बारकाईने शिकवले.
सद्गुरु अनुराधावाडेकर यांच्याप्रती असलेला अपार भाव !

‘सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) या गुरुदेवांचेच एक रूप आहेत’, असा पू. (सौ.) संगीता जाधव यांचा भाव आहे. – श्री. बळवंत पाठक
३. साधकाला योग्य दृष्टीकोन देऊन अंतर्मुख करणे
‘इतरांच्या स्वभावदोषांमुळे मला त्यांच्याशी जुळवून घेता येत नाही’, असा माझा समज होता. माझी वृत्ती बहिर्मुख असल्याने ‘मीच योग्य आहे’, अशी माझी धारणा झाली होती. त्या वेळी पू. काकूंनी ‘माझ्यामध्ये जसे स्वभावदोष आहेत, तसे इतरांमध्येही स्वभावदोष आहेत’, अशा स्वरूपाची स्वयंसूचना मला लिहून दिली. यामुळे मला अंतर्मुख होण्यास पुष्कळ साहाय्य झाले.
४. भावजागृती होण्यासाठी मार्गदर्शन करून साधकांकडून तशी कृती करून घेणार्या पू. (सौ.) संगीता जाधव !

पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सेवा करत असतांना किंवा कोणताही प्रसंग हाताळतांना ‘स्वतःच्या जागी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) असते, तर त्यांनी कृती कशी केली असती ?’, असा भाव ठेवण्यास शिकवले. त्यामुळे एक दैवी कृपा अनुभवता आली. ही केव्हाही न संपणारी दैवी शिदोरी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी मला दिली. हा भावजागृती प्रयोग केल्यावर मला श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवले आणि सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य झाले, उदा. एकदा मी आणि एक साधक मुंबई येथील वांद्रे-कुर्ला संकुल येथे (बी.के.सी.) अमेरिकन वाणिज्य दूतावासासमोर ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी पोलीस अनुमती घेण्यास गेलो होतो. तो कोरोनाचा काळ होता. तेव्हा तेथील पोलीस उपायुक्त आम्हाला म्हणाले, ‘‘हा परिसर संवेदनशील असल्याने तुम्हाला अनुमती मिळणार नाही; परंतु आमच्या कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करा. त्यास मी अनुमती देतो.’’ तेव्हा कोरोनामुळे केवळ ४ जणांना आंदोलनाची अनुमती मिळाली होती. त्यानुसार आम्ही निषेध व्यक्त केला. याचे वृत्त आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचून परिणामकारक निषेध नोंदवला. गुरुदेव असते, तर त्यांनी कृती कशी केली असती?’, असा भाव ठेवल्यामुळे मला ही सेवा करता आली.
५. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे अस्तित्व आणि पू. (सौ.) जाधव यांच्यातील भाव यांमुळे साधकाला त्यांच्या चैतन्याच्या संदर्भात येत असलेली अनुभूती
अ. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या अस्तित्वामुळे आणि पू. संगीता जाधव यांच्यातील भावामुळे ठाणे सेवाकेंद्रात महर्लोकाप्रमाणे वातावरण झाले आहे’, अशी मला अनुभूती येते.
आ. ठाणे सेवाकेंद्रात होणारे सत्संग किंवा शिबिरे यांमध्ये मला ऋषीमुनींचे अस्तित्व जाणवते.
इ. सेवाकेंद्रातून बाहेर किंवा घरी गेल्यावर मला पृथ्वीवर आल्याची जाणीव होते.
६. साधनेत पदोपदी साहाय्य करणार्या दहा देवदूतांना समवेत घेऊन प्रयत्न केल्यास लवकरच देवाच्या चरणांपर्यंत पोचू’, असे सांगून आश्वस्त करणे
पू. (सौ.) जाधव यांनी साधनेत पदोपदी साहाय्य करणार्या दहा देवदूतांची ओळख करून दिली. हे दहा देवदूत, म्हणजे ‘ध्येय, नियोजन, भाव, पालटण्याची तळमळ, प्रार्थना, सतर्कता, अनुसंधान, अपराधीभाव, कृतज्ञता आणि शरणागती’ हे होय. साधकांनी हे दहा देवदूत बोलावल्यावर ते तत्परतेने साहाय्य करतात. ‘या सर्व देवदूतांचे साहाय्य पदोपदी कसे घ्यावे ?’, हे पू. (सौ.) जाधव यांनी साधकांना शिकवले. ‘प्रसाराला गेल्यावर, घरात असतांना किंवा प्रत्येक कृती करतांना या देवदूतांना समवेत घेऊन गेलो, तर आपण लवकरच देवाच्या चरणांपर्यंत पोचू’, असे सांगून त्यांनी साधकांना आश्वस्त केले आहे.’
– श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र (२३.६.२०२६)
बुद्धीप्रामाण्यवादी साधनेच्या अभावी आंधळेच असतात !
देवाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची नागपूर येथील चि. सुमिरा सचिन सहारे (वय ४ वर्षे) !
ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !