
‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वाेत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक सनातन प्रभात ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे, तसेच त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दलचे प्रेम वाढत आहे. ‘या अंकाच्या वाचनाने आम्हाला पुढची दिशा आणि मार्गदर्शन मिळते’, असे काही वाचक उत्स्फूर्तपणे सांगतात.
असे असतांनाही ‘प्रथम भेटीतच जिज्ञासूंना वाचक बनण्यास कसे सांगू ? त्यांच्याशी जवळीक साधून नंतर वाचक होण्यासाठी प्रवृत्त करूया’, असे बर्याच साधकांना वाटते. त्यामुळे ते जिज्ञासूंना वाचक होण्यासाठी तत्परतेने उद्युक्त करत नाहीत.
आपल्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे जिज्ञासू अमूल्य सत्संगापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वत्रच्या साधकांनी जिज्ञासूंना वाचक बनवण्यासाठी प्रथम भेटीपासूनच प्रयत्न करावेत.’
(१२.५.२०२६)
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !