हिंदुत्वनिष्ठ श्री. उदय महा यांच्याकडून प्रशासनाला नोटीस !
‘छत्रपती संभाजी महाराज सभागृह’ नाव देण्याची मागणी !

अकोला – अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला ‘शहीदे वतन हजरत टीपू सुलतान सभागृह’ असे दिलेले नाव पूर्णपणे अवैध आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अकोला येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. उदय महा (वय ६४ वर्षे) यांनी त्यांचे अधिवक्ता मुकुंद जालनेकर यांच्या माध्यमातून पालिका आयुक्त, महापौर आणि सभापती यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘जर हे अवैध नाव हटवले नाही, तर संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध थेट न्यायालयात कायदेशीर दाद मागण्यात येईल’, असे नोटिसीत म्हटले आहे.
🚨 Akola Municipal Corporation's naming of its Standing Committee Hall after Tipu Sultan has been declared illegal. – Legal notice by Hindutva activist Uday Maha
Vigilant citizens can bring about change.
If roads or other public places in the State have been named after Mughal… pic.twitter.com/hW258xkkEm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2026
नोटिशीमध्ये पुढे म्हटले की,
१. शासनाने थोर व्यक्तींची एक अधिकृत सूची प्रसिद्ध केली आहे. शासकीय धोरणानुसार त्याच सूचीतील नावे शासकीय इमारती किंवा सभागृह यांना देणे बंधनकारक आहे.
२. या सूचीत ‘टिपू सुलतान’ नावाचा कुठेही समावेश नाही. त्यामुळे असे नाव सभागृहाला देणे, हा थेट शासकीय आणि प्रशासकीय आदेशांचा भंग आहे. ती कृती पूर्णपणे अवैध ठरते.
३. या सूचीत ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव आहे. महानगरपालिकेने दिलेल्या समयमर्यादेत टिपू सुलतानचे अवैध नाव हटवून अधिकृत सूचीनुसार ‘छत्रपती संभाजी महाराज सभागृह’ असे नाव द्यावे.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय