नवी देहली – वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दावा केला आहे की, संयुक्त अरब अमिरात भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ आणि हवाई संरक्षण यंत्रणा ‘आकाशतीर’ खरेदी करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा करत आहे. आखातामध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमिरातने स्वतः ही शस्त्रे खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. अमिरातला ‘ब्रह्मोस’ विकण्यापूर्वी भारताला रशियाची अनुमती घ्यावी लागेल; कारण याची निर्मिती भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या केली आहे. अमिरातसमवेत रशियाचे संबंध चांगले असल्याने ही अनुमती मिळण्याची शक्यता आहे.
२९० कि.मी. मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र व्हिएतनाम आणि इंडोनेशिया यांना विकण्याचा करार भारताने यापूर्वी केला आहे. आता थायलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल आणि चिली या देशांशी विक्रीच्या संदर्भात चर्चा चालू आहे. भारताने फिलिपिन्सला ब्रह्मोसची विक्री केली आहे.

भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड