स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग

स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक २०)

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतांना दिसतात. ‘मूड स्विंग्स’ (मनाच्या स्थितीतील पालट), चिंता, चिडचिड, नैराश्य, झोपेचा त्रास या तक्रारी अनेक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. यामागे केवळ मानसिक कारणे नसून ‘हार्मोनल’ पालट, आहार, जीवनशैली आणि भावनिक घटक यांचा एकत्रित परिणाम असतो. आयुर्वेद या समस्यांकडे मन-शरीर एकत्रित (माईंड-बॉडी) दृष्टीने पहातो आणि संतुलन साधण्यावर भर देतो.

लेखांक १९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1051565.html

१. मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ यांचा संबंध

स्त्रीच्या आयुष्यात ‘प्यूबर्टी’ (तारुण्य), मासिक पाळी, गर्भावस्था, प्रसुतीनंतरचा काळ आणि ‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) या प्रत्येक टप्प्यावर ‘हार्मोन्स’मध्ये पालट होतात. या पालटांचा थेट परिणाम मेंदूचे कार्य आणि भावना यांवर होतो. त्यामुळे पाळीपूर्व चिडचिड (पी.एम्.एस्.), प्रसुतीनंतर मनस्थितीत पालट, ‘मेनोपॉज’मध्ये नैराश्य किंवा चिंता, अशा समस्या दिसू शकतात.

२. प्रमुख लक्षणे

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

सतत चिंता, बेचैनी, ‘मूड स्विंग्स’, चिडचिड, झोपेचा त्रास (Insomnia), लक्ष केंद्रित न होणे, थकवा, उत्साह न्यून होणे, नैराश्य, एकटेपणा ही लक्षणे जाणवतात.

३. आयुर्वेदाचा दृष्टीकोन

आयुर्वेदानुसार मनाचे आरोग्य सत्त्व, रज आणि तम या ३ गुणांवर अवलंबून असते.

अ. सत्त्व : शांतता, स्थैर्य

आ. रज : चंचलता, अस्थिरता

इ. तम : जडत्व, नैराश्य

यासह वातदोष वाढल्यास चिंता आणि अनिद्रा, पित्तदोष वाढल्यास चिडचिड अन् राग, तसेच कफदोष वाढल्यास आळस आणि नैराश्य वाढते.

४. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

‘हार्मोनल’ असंतुलन, मानसिक ताण आणि भावनिक दबाव, झोपेचा अभाव, मंद अग्नी अन् आम, अनियमित आहार आणि दिनचर्या

५. आयुर्वेदानुसार चिकित्सेत विचार करतांना

स्त्रीची प्रकृती (वात-पित्त-कफ), समस्या कोणत्या टप्प्यावर (पाळीपूर्व चिडचिड (पी.एम्.एस्.)/ प्रेग्नसी (गरोदर) / मेनोपॉज), झोप, आहार आणि पचनशक्ती, मानसिक ताणाचे कारण अन् ‘हार्मोनल’ लक्षणे यांचा विचार केला जातो.

६. मुख्य उद्देश

मन-शरीर संतुलन + दोष शमन + सत्त्ववृद्धी

७. आयुर्वेदाची उपचारपद्धत

अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

१. अश्वगंधा : ताण न्यून होऊन झोप सुधारते

२. ब्राह्मी : मेंदू कार्य आणि स्मरणशक्ती

३. शंखपुष्पी : मानसिक शांतता

४. जटामांसी : चिंता अन् अनिद्रा न्यून होणे

५. शतावरी : ‘हार्मोनल’ संतुलन

आ. पंचकर्म

१. बस्ती : वातदोष न्यून करण्यासाठी

२. शिरोधारा : मन शांत करण्यासाठी

३. अभ्यंग : वातशमन अन् ‘रिलॅक्सेशन’ (विश्रांती)

४. नस्य : मेंदू आणि इंद्रिय संतुलन

८. घरगुती आयुर्वेदाचे उपाय

प्रतिदिन ठराविक वेळेला झोपून उठणे, ध्यान, प्राणायाम (अनुलोम-विलोम, भ्रामरी), जायफळाचे दूध रात्री किंवा दूध-तूप घेणे, ‘स्क्रीन टाइम’ (भ्रमणभाष किंवा टीव्ही पहाणे) न्यून करणे, स्वतःसाठी वेळ काढणे (सेल्फ केअर)

९. आहार मार्गदर्शन

अ. काय घ्यावे ? : सत्त्वयुक्त आहार (ताजे, गरम, हलके), दूध, तूप, फळे, बदाम, खजूर

आ. काय टाळावे ? : अधिक कॅफीन, ‘जंक फूड’ (पिझ्झा, बर्गर वगैरे पदार्थ), साखर, उशिरा खाणे

१०. जीवनशैली मार्गदर्शन

नियमित योग आणि व्यायाम, निसर्गात वेळ घालवणे, सकारात्मक लोकांशी संवाद, तसेच ताण व्यवस्थापन

११. निष्कर्ष

स्त्रियांचे मानसिक आरोग्य हे ‘हार्मोन्स’, जीवनशैली आणि भावनिक स्थिती यांच्याशी घट्ट जोडलेले आहे. आयुर्वेद या समस्यांवर केवळ औषधांवर अवलंबून न रहाता मन, शरीर आणि जीवनशैली यांचा समतोल साधण्यावर भर देतो. योग्य आहार, दिनचर्या, औषधी उपचार आणि मानसिक आधार यांच्या साहाय्याने स्त्री मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम, शांत अन् आनंदी जीवन जगू शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

🪷 ‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷