स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक २१)
गर्भाशयातील ‘फायब्रॉईड्स’ (Fibroids) हे स्त्रियांमध्ये आढळणारे एक सामान्य; पण महत्त्वाचे विकार आहे. हे गर्भाशयातील स्नायूंच्या (muscle layer) मध्ये सिद्ध होणारे गाठीसारखे वाढलेले ऊतक असते. बहुतांश वेळा हे निरुपद्रवी (benign) असले, तरी काही स्त्रियांमध्ये यामुळे पाळीतील त्रास, वेदना आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदात या अवस्थेला अर्बुद / मांसगाठ / गुल्म या संकल्पनांशी जोडले जाते.
लेखांक २० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1054043.html
१. फायब्रॉईड्स म्हणजे काय ?
गर्भाशयाच्या भिंतीमध्ये सिद्ध होणार्या स्नायूंच्या गाठी, म्हणजे फायब्रॉईड्स. हे आकाराने लहान ते मोठे असू शकतात आणि त्यांच्या स्थानानुसार (intramural, submucosal, subserosal) लक्षणे पालटतात.
२. प्रमुख लक्षणे

अधिक प्रमाणात पाळी (Heavy bleeding), पाळी दीर्घकाळ चालणे, पोटात जडपणा किंवा गाठ जाणवणे, कंबरदुखी, पाठदुखी, वारंवार लघवी लागणे, गर्भधारणेत अडचण ही प्रमुख लक्षणे होत.
३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा
अ. कफदोष वाढ – गाठी निर्माण
आ. पित्तदोष – रक्तस्राव वाढ
इ. वातदोष – वेदना आणि गाठींची हालचाल
ई. आर्तव वह स्रोतस
उ. दुष्टीमंद अग्नी आणि आम संचय
४. आयुर्वेदानुसार चिकित्सेत विचार करतांना
अ. गाठीचा आकार आणि स्थान
आ. पाळीचा इतिहास
इ. रक्तस्रावाची तीव्रता
ई. स्त्रीची प्रकृती
उ. गर्भधारणेची इच्छा आहे का ?
५. मुख्य उद्देश
कफ शमन + गाठ न्यून करणे + रक्तसंतुलन + स्रोतस शुद्धी
६. आयुर्वेदाचे औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)
अ. कांचनार गुग्गुळ – गाठी न्यून करण्यासाठी
आ. वरुणािद काढा
इ. अशोक – रक्तस्राव नियंत्रित
ई. लोध्र – गर्भाशय संकुचन
उ. मंजिष्ठा – रक्तशुद्धी
ऊ. त्रिफळा – पचन आणि शुद्धी
७. घरगुती उपाय
कोमट पाणी पिणे; हलका, पचायला सोपा आहार, वजन नियंत्रण, योग आणि प्राणायाम, पोटाला तेलाने मालिश करणे.
८. आहार
अ. काय घ्यावे ? : फळ भाज्या, फळे, ताजे अन्न
आ. काय टाळावे ? : जंक फूड (पिझ्झा, बर्गर), साखर, तेलकट पदार्थ, दिवसा झोप
९. निष्कर्ष
फायब्रॉईड्स हे सामान्य असले, तरी योग्य वेळी उपचार न केल्यास त्रास वाढू शकतो. आयुर्वेद या विकारावर मूळ कारणांवर आधारित उपचार देतो आणि नैसर्गिकरित्या गाठी न्यून करण्यास साहाय्य करतो.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

प्रादेशिक अस्मिता किती ताणायची ?
विदेशी योगदान नियमन कायदा (एफ्.सी.आर्.ए.), परकीय निधी, देशांतर्गत सुरक्षा आणि भारत-अमेरिका संघर्ष
धार्मिक स्थळांचे पावित्र्य, कायदेशीर मर्यादा आणि सार्वजनिक शिस्त : एक सर्वसमावेशक विश्लेषण
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व