स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक १९)
‘मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असला, तरी त्यानंतर शरिरात काही पालट वेगाने घडू लागतात. ‘हार्मोन्स’मध्ये (संप्रेरकांमध्ये) होणारी घट, धातूंची क्षीणता आणि जीवनशैलीतील पालट यांमुळे काही आजारांची शक्यता वाढते. त्यामुळे मेनोपॉजनंतरची काळजी ही केवळ उपचारापुरती नसून प्रतिबंध, पोषण आणि संतुलन यांवर आधारित असणे आवश्यक आहे. आयुर्वेद या काळात वातदोष प्राबल्य मानतो आणि त्यानुसार योग्य आहार-विहार अन् औषधी मार्गदर्शन सुचवतो.
लेखांक १८ साठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1049086.html

१. मेनोपॉजनंतरची अवस्था म्हणजे काय ?
मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रीच्या शरिरात ‘एस्ट्रोजेन’ (लैंगिक संप्रेरक) न्यून होतो, ज्याचा परिणाम हाडे, हृदय, त्वचा आणि मानसिक आरोग्यावर होतो. आयुर्वेदानुसार या अवस्थेत धातू क्षय वाढतो आणि शरिराची पोषण क्षमता न्यून होऊ लागते.

२. मेनोपॉजनंतर वाढणारे प्रमुख आजार
अ. हाडांची ठिसूळता (Osteoporosis) : हाडे कमकुवत होणे, ‘फ्रॅक्चर’चा (अस्थीभंगाचा) धोका वाढू शकतो; कारण अस्थी धातू क्षय आणि वात वाढणे
आ. सांधेदुखी आणि संधीवात : गुडघे, पाठ, कंबर येथे वेदना आणि कडकपणा वाढतो; कारण वातदोष प्राबल्य वाढते.
इ. हृदयविकार आणि रक्तदाब : ‘कोलेस्ट्रॉल’ वाढणे अन् हृदयावर ताण येणे; कारण धातू क्षय आणि जीवनशैली.
ई. वजन वाढ आणि चयापचय बिघाड : ‘मेटाबॉलिझम’ न्यून होणे आणि चरबी साठणे; कारण अग्नी मंद होणे अन् कफ वाढणे.
उ. मधुमेह (Diabetes) : मधुमेहाचे (ब्लड शुगर) नियंत्रण बिघडणे; कारण अग्नी आणि धातू यांचे असंतुलन होणे.
ऊ. मानसिक समस्या : चिंता, नैराश्य, झोपेचा त्रास वाढण्याची शक्यता असते; कारण वात आणि रज-तम यांची वाढ होते.
३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा
अ. वातदोष वाढ : कोरडेपणा, वेदना, हाडांची कमजोरी
आ. धातू क्षय : शरिराची शक्ती न्यून
इ. अग्नी मंद होणे : पोषण न्यून
ई. स्रोतस अवरोध : चयापचय बिघाड
४. आयुर्वेदाच्या चिकित्सेत विचार करतांना
स्त्रीची प्रकृती (वात-पित्त-कफ); हाडे, सांधे आणि हृदयाची स्थिती, पचनशक्ती (अग्नी), वजन अन् चयापचय, मानसिक स्थिती, तसेच आधीचे आजार यांचा विचार केला जातो.
५. मुख्य उद्देश
वातशमन + धातूपोषण + अग्नी सुधारणा + रोगप्रतिबंध
६. आयुर्वेदाची उपचारपद्धत
अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)
१. अश्वगंधा : हाडे आणि स्नायू मजबूत करते
२. शतावरी : स्त्री ‘हार्मोनल’ (संप्रेरक) संतुलन
३. गुडुची : रोगप्रतिकारशक्ती वाढवते
४. त्रिफळा : पचन सुधारते
५. लक्षादी गुग्गुळ / कांचनार गुग्गुळ : हाडे आणि गाठी यांसाठी
आ. पंचकर्म :
१. बस्ती : वातशमनासाठी सर्वांत उपयुक्त
२. अभ्यंग (तेल मालिश) : सांधेदुखी न्यून होणे
३. स्वेदन : कडकपणा न्यून होणे
७. घरगुती आयुर्वेदाचे उपाय
प्रतिदिन कोमट पाणी पिणे, तिळाच्या तेलाचे मालिश (वातशमनासाठी), नियमित चालणे / योग आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवणे (‘ड’ जीवनसत्त्वासाठी).
८. आहार मार्गदर्शन
अ. काय घ्यावे ? : दूध, तूप, तीळ, बदाम, हिरव्या भाज्या, फळे, सत्त्वयुक्त ताजे अन्न
आ. काय टाळावे ? : जंक फूड, साखर, थंड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, अतीखाणे
९. जीवनशैली मार्गदर्शन
नियमित व्यायाम (योग, चालणे), ताण नियंत्रण (ध्यान, प्राणायाम), पुरेशी झोप, सकारात्मक सामाजिक संपर्क
१०. निष्कर्ष
मेनोपॉजनंतरचा काळ हा स्त्रीच्या आरोग्यासाठी संवेदनशील असला, तरी योग्य काळजी घेतल्यास तो निरोगीपणे जगता येतो. आयुर्वेद या काळात रोग होण्यापूर्वी प्रतिबंध यावर भर देतो. संतुलित आहार, योग्य दिनचर्या, औषधी उपचार आणि मानसिक स्थैर्य यांच्या साहाय्याने स्त्री दीर्घकाळ निरोगी, सक्रिय अन् आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
पैसा जिंकला, नाती हरली !
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले