सध्या गाजत असलेले प्रकरण, म्हणजे लोहगडावर केतन अग्रवालची त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने केलेली हत्या. या प्रकरणात गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नसला, तरी अन्वेषण यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यांवरून पुढील गंभीर सूत्रे लक्षात येतात :

१. मुलाचा जीव घेण्यापेक्षा जर मुलीच्या आयुष्यात आधीच दुसरा मुलगा वा प्रियकर होता, तर विवाहाची सर्व प्रक्रिया तिथेच थांबवून त्या मुलीने स्पष्टपणे तिचे मत सांगायला हवे होते.
२. केतन याने १७ कोटी व्यय करून नोव्हेंबरमध्ये होणार्या लग्नासाठी सर्व सिद्धता केली होती. यावरून हेही लक्षात येते की, तो या लग्नाविषयी गांभीर्याने घेत आहे.
३. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून असेही उघड झाले आहे की, सियाने केतनला २-३ वेळा मारण्याचा कट रचला होता. नेमके किती व्यक्ती त्यात सहभागी होते, हे शेवटी कळेलच; पण केलेली हत्या ही नकळत घडलेली कृती नसून पूर्वनियोजित आहे, असे दिसते .

४. लग्न मोडून दुसर्या व्यक्तीकडे जाणे समजू शकतो; पण आपल्या मार्गात अडचण करणार्या व्यक्तीशी गोड बोलून जाळ्यात आणून घातपात करणे, याला समाज कधीच क्षमा करणार नाही.
५. पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांना फसवून कदाचित् ती मुलगी अन् तिचे साथीदार पुराव्याअभावी बाहेर येतीलही; पण त्यांची विकृत मानसिकता हेच दर्शवते की, क्षणिक सुखासाठी आज व्यक्ती कुणाचे बरे वाईट करायला कोणत्याही थराला जाऊ शकते.
६. आतापर्यंत कथित प्रेमातील अन्य घटना पहिल्या, तर काही प्रकरणात मुलाने मुलीच्या चेहर्यावर आम्ल टाकणे, बायकोचे बाहेरच्या मुलासह असलेले प्रकरण नवर्याला कळू नये; म्हणून जेवणात विष देऊन मारणे इत्यादी घटना सर्रासपणे उघडकीस आल्या आहेत. काही ठिकाणी जलद पैसे कमावण्यासाठी आर्थिक फसवणूक, हनीट्रॅप, आमीष दाखवणे, असे अनेक चुकीचे मार्ग वापरले जातात.
७. या घटनांमागे असेही एक कारण आहे की, दुसर्याला शारीरिक / मानसिक वेदना दिल्यावर स्वतःला अधिक सुख मिळेल, या भ्रमात व्यक्ती रमते, म्हणून अशा कृती करतांना त्याचे परिणाम बघितले जात नाहीत.
– श्री. स्वप्नील भोसले, फोंडा, गोवा. (१०.७.२०२६)
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
Byrathi Suresh : सुट्टे पैसे न दिल्याने मंत्र्यांना वाहकाने बसमधून खाली उतरवले !
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !