‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश कुमार सिंग यांनी प्रख्यात विचारवंत, लेखक, सामाजिक विश्लेषक आणि देहली विद्यापिठातील हिंदीचे प्राध्यापक अपूर्वानंद झा यांची मुलाखत घेतली आहे. यात अपूर्वानंद झा म्हणाले, ‘‘हिंदु इतके कट्टर झाले आहेत की, हिंदूंच्या प्रत्येक घरातील हिंदु हा संभाव्य खुनी किंवा संभाव्य बलात्कारी आहे. प्रत्येक हिंदु प्रत्यक्षात किंवा स्वप्नात एखाद्या मुसलमान स्त्रीवर बलात्कार करत असतो आणि याला उचित मानले जाते.’’

१. साम्यवाद्यांची हिंदूंच्या प्रतिकाराविषयीची भूमिका
मुकेश कुमार सिंग आणि अपूर्वानंद झा हे दोघेही साम्यवादी विचारांचे उदारमतवादी (हाही एक विनोदच आहे) आहेत. प्रतिकार करणारा हिंदू यांना कधीच नको. इतिहासातही जिथे जिथे प्रतिकार केला, तिथे तिथे प्रारंभ कुणी केला आणि प्रतिकार केलाच नसता, तर काय झाले असते, हे कधी सांगितलेच जात नाही. प्रतिकार केला नाही, तर ‘हिंदूंचा नरसंहार’ असा शब्द वापरत नाहीत आणि केलाच, तर ‘जातीय दंगली’ असा शब्द वापरला जातो.
२. गांधींनी मुसलमानांच्या अत्याचाराविषयी हिंदु महिलांना दिलेला सल्ला अन् त्यांनी काढलेले अक्षम्य उद्गार

नौखाली आणि काश्मीर येथे ‘हिंदु नरसंहार’ झाला; कारण हिंदूंनी प्रतिकारच केला नाही ! परिणामी नरसंहार आणि जीव वाचवण्यासाठी पलायन झाले. नौखालीत तर नोव्हेंबर १९४६ ते मार्च १९४७ या काळात गांधीजी उपस्थित असतांना हिंदूंचा नरसंहार झाला आहे. तो एकतर्फी असल्याने त्याला ‘जातीय दंगली’ म्हणता येत नव्हते; म्हणून इतिहासाच्या पुस्तकातून दाबून टाकण्यात आला. तो नरसंहार पाठ्यपुस्तकातही आला नाही आणि कधी शिकवलाच नाही. तिथे त्या वेळेस मुसलमान जमावाने केलेल्या बलात्कारातून गरोदर राहिलेल्या महिलांना अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा सल्ला देतांना गांधी म्हणाले, ‘जर एखाद्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग आला आणि ती स्वतःचा बचाव करू शकत नसेल, तर तिने दात अन् ओठ घट्ट दाबून मृत्यू पत्करावा.’ असा सल्ला देणारे गांधी त्यानंतर देहलीत झालेल्या प्रार्थनासभेत म्हणाले, ‘जर मुसलमानांनी सर्व हिंदूंना मारून टाकले, तरी हिंदूंनी हिंसेचा मार्ग पत्करू नये, तर शांतपणे मृत्यूला सामोरे जावे. जर त्यांनी असे केले, तर हिंदु धर्म अमर होईल आणि त्या बलीदानातून आपण एका नव्या भारताचा किंवा नव्या विश्वाचा उदय पाहू.’
३. अपूर्वानंद झा यांचे विधान राजकीय अन् इस्लामी कट्टरता, तसेच आतंकवादाला झाकणारे संरक्षककवच !
प्रत्येक हिंदु घरातील हिंदु कधीच हिंसक नव्हता आणि होणारही नाही. तो फार तर आपल्याच भावकीत न्यायालयाच्या पायर्या झिजवून अधिवक्त्यांचे बंगले उभारण्यास साहाय्य करील. म्हणूनच ‘प्रत्येक हिंदु हिंसक आणि बलात्कारी झाला आहे’, हे विधान राजकीय अन् इस्लामी कट्टरता, तसेच आतंकवादाला झाकणारे संरक्षककवच आहे. याविरुद्ध कुणी बोलणार नाही आणि त्याविरुद्ध काहीही होणार नाही. उलट झुंडशाही सक्रीय होईल. मनुवादी, संघवाले, अंधभक्त वगैरे म्हणत एक झुंड आक्रमण करील आणि दुसरी झुंड मुसलमानांचे लांगूलचालन करणारे गुलाम वगैरे म्हणत प्रतिआक्रमण चढवेल. मूळ मुद्दा बाजूलाच राहील. जसा प्रत्येक हिंदु हिंसक आणि बलात्कारी नाही, तसाच प्रत्येक मुसलमान अन् ख्रिस्तीही नाही, तरीही हे नरसंहार का घडले, हा मूळ प्रश्नच बाजूला पडत आहे, तसेच यामागचे मूळ कारण अन् भेद लक्षात न घेता राज्यघटनेने सर्व पंथियांना प्रचार आणि प्रसार यांचा समान घटनात्मक अधिकार देणेही चुकीचेच आहे.
४. …ही वाळवी केवळ हिंदु समाजच नव्हे, तर संस्कृतीही पोखरल्याविना थांबणार नाही !
वास्तविक प्रत्येक पंथ आणि राज्यव्यवस्था यांचा काही संबंध नसणे, ही इहवादी भूमिका सोडून भारताने प्रत्येक पंथाला चुचकारणारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) अन् समाजवादी विचारसरणी स्वीकारली. सांस्कृतिक मार्क्सवादाला शिक्षण क्षेत्रावर अनिर्बंध सत्ता गाजवू दिली. ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या आणि प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले अन् त्यांना विनाकारण मृत्यू पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदु सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना ‘उग्र आणि हिंसक’ ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला ‘पॉलिटीकली करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या योग्य) ठेवणारा हिंदु याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे ही वाळवी केवळ हिंदु समाजच नव्हे, तर संस्कृतीही पोखरल्याविना थांबणार नाही !
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.
(साभार : ‘प्रसन्नवदने ब्लॉग’वरून)
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
भारतीय वाद्यांचा नाद ऐकल्यावर त्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड