
‘हे खाऊ नका’, ‘ते खाऊ नका’, ‘अमक्या ऋतूत हे खाऊ नका’, मग खायचे तरी काय ? खरेतर ‘अती तेथे माती’ होते, हे सर्वच जाणतात. त्यामुळे अपथ्य म्हणून सांगितलेले पदार्थ थोडे थोडे आणि सणासुदीला घरात किंवा पाहुणे म्हणून गेल्यानंतर खाण्यास काहीच हरकत नाही. तसे केल्यास तुम्ही आयुष्यभर ते पदार्थ खाऊ शकता, अन्यथा भांडे भरेपर्यंत पाणी सांडत नसते, ते एकदा भरले की, एक थेंब पाणी टाकले, तरी सांडते, त्याप्रमाणे दोष वाढल्यानंतर तुमचे खाणे तर दूरच; पण त्या पदार्थाकडे बघितले तरी त्रास होईल; म्हणून स्वास्थ्यासाठी आहारावर-जीभेवर नियंत्रण असावेच लागते.

आपले जेवढे सण आहेत, त्यांचा आयुर्वेदाप्रमाणे ‘मेनू’ (पदार्थसूची) आपल्या पूर्वाचार्यांनी ठरवून प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे दिसून येते. अशा वेळी अपथ्य तरी ते ‘सात्म्य’ झाल्याने फारसा त्रास होत नाही. गोडधोड पदार्थ अन् तळलेले पदार्थ हे सर्व दिवाळीत आपल्याकडे करतात; कारण त्या वेळी थंड वातावरणामुळे वाढलेल्या जठराग्नीमुळे ते सहज पचतात. संक्रांतीस तीळगूळ आणि तिळाचे लाडू थंडीत पचून तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यास, शरिरात ऊर्जा निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतात. वर्षाऋतूत पावसाळ्यात अग्नी मंद असतो; म्हणून बरेसचे उपवास त्या ऋतूत येतात. व्यक्तीने लंघन करावे अन् हलका आहार घ्यावा; म्हणून याच दिवसात अधिक उपवास आलेले असतात. (सध्या उपवासाच्या दिवशी सर्वच दुप्पट खातात तो भाग वेगळा.) शरदऋतूत
श्री गणेशमूर्तीचे आगमन होते. हा काळ उष्णतेचा. नैसर्गिक पित्त-दोषाचा असल्याने या दिवसात दुर्वा-हरळ यांचा रस काढून प्यावा, म्हणजे उष्णता न्यून होते. ‘गणपतीस दूर्वा का वहातात ?’, हे माहिती करून घेतल्यानंतर समजते.
– वैद्य रामदास आव्हाड, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
(साभार : ग्रंथ ‘आहार आणि आरोग्य’ रामदासकृत पंचकर्मबोध)
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा
Sri Mahakaleshwar Temple : उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराकडे आहे ४७२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि ३०० कोटी रुपयांचे सोने-चांदी !