तिसर्या पसार धर्मांधाचा शोध चालू !
वर्गमैत्रीण असल्याचा अपलाभ घेत भेटण्याच्या निमित्ताने हॉटेलमध्ये बोलवून अत्याचार !

नागपूर – भारतीय वायूसेनेतील एका अधिकार्याच्या २४ वर्षीय पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करणे, अश्लील व्हिडिओद्वारे फसवून तिच्याकडून लाखो रुपये उकळणे आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे आणि अमीन शेख यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तिसरा आरोपी हजरत मौलाना पसार आहे. पोलिसांनी या प्रकरणात विविध गुन्हे नोंदवले आहेत.
१. मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे (वय २६ वर्षे) हा पीडितेचा जुना वर्गमित्र होता. त्याने एका कामानिमित्त भेटण्यासाठी पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे शीतपेयातून तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली.
२. अश्लील व्हिडिओंची भीती दाखवून आरोपीने पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले. छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून ३ लाख ९ सहस्र रुपये उकळले.
३. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात होता. पीडितेने सोडवण्याची वारंवार विनंती करूनही आरोपी अय्याजने तिचे हात घट्ट धरून ठेवले होते. तो धार्मिक मंत्र म्हणत तिच्या अंगावर वारंवार फुंकर मारत होता.
४. धर्मांतराच्या प्रयत्नानंतर आरोपींनी पुन्हा एकदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
५. तीन दिवसांनी पीडितेचा पती घरी आल्यावर तिने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक