स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक १८)
‘मेनोपॉज’, म्हणजे स्त्रीची मासिक पाळी कायमस्वरूपी थांबण्याची अवस्था. साधारणपणे ४५ ते ५० वर्षांच्या कालावधीत हा पालट दिसून येतो. हा आजार नसून एक नैसर्गिक जैविक टप्पा आहे; मात्र या काळात होणारे ‘हार्मोनल’ (संप्रेरक) पालट स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. ‘आयुर्वेद या अवस्थेकडे रजोनिवृत्ती म्हणून पहातो आणि ती दोष संतुलन, धातू पोषण आणि मन-शरीर समतोल राखून सहज पार करता येते’, असे सांगतो.
लेखांक १७ साठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1046492.html

१. मेनोपॉज म्हणजे काय ?
‘सलग १२ महिने मासिक पाळी न येणे’, ही मेनोपॉजची वैद्यकीय व्याख्या मानली जाते. या काळात ‘एस्ट्रोजेन हार्मोन’ न्यून होतो, ज्यामुळे शरिरात विविध पालट जाणवतात. आयुर्वेदानुसार हा कालावधी वातदोष प्राबल्याचा असतो आणि धातू क्षय (Degeneration) हळूहळू चालू होतो.
२. प्रमुख लक्षणे
यामध्ये ‘गरम झटके (Hot flashes) आणि घाम येणे, पाळी अनियिमत होऊन नंतर बंद होणे, चिडचिड, ‘मूड स्विंग्स’ (भावनांमध्ये पालट), चिंता, झोपेचा त्रास (Insomnia), योनीत कोरडेपणा, त्वचा कोरडी होणे, केस गळणे, थकवा वाटणे, ऊर्जा न्यून वाटणे, सांधेदुखी, अंगदुखी’, अशा प्रकारची प्रमुख लक्षणे दिसून येतात.
३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा
अ. वातदोष वाढ : कोरडेपणा, वेदना, झोपेचा त्रास
आ. पित्तदोष असंतुलन : गरम झटके, चिडचिड
इ. कफ घट : स्थैर्य न्यून होणे, थकवा
ई. धातू क्षय : हाडे, त्वचा, केस यांवर परिणाम
उ. अग्नी मंद / अस्थिर : पचन आणि पोषण बिघडते
४. आयुर्वेदानुसार चिकित्सेत विचार करतांना

अ. स्त्रीची प्रकृती (वात-पित्त-कफ)
आ. लक्षणांची तीव्रता आणि कालावधी
इ. झोप, पचन (अग्नी) आणि मलविसर्जन
ई. हाडे / सांधे तक्रारी (अस्थी धातू)
उ. मानसिक स्थिती (ताण, चिंता)
ऊ. सहविकार (थायरॉईड, मधुमेह इत्यादी)
५. मुख्य उद्देश
वात-पित्त शमन + धातुपोषण + अग्नी संतुलन + मानसिक स्थैर्य
६. आयुर्वेदाची उपचारपद्धत
अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)
१. शतावरी : ‘हार्मोनल’ समतोल आणि योनी कोरडेपणा न्यून
२. अश्वगंधा : शक्ती, झोप आणि ताण नियंत्रण
३. गुडुची (गिलोय) : रोगप्रतिकारशक्ती
४. यष्टिमधु : पित्तशमन आणि दाह न्यून
५. त्रिफळा : पचन आणि स्रोतस शुद्धी
आ. पंचकर्म
१. बस्ती : वातशमनासाठी सर्वांत उपयुक्त
२. विरेचन : पित्तशमन आणि गरम झटके कमी करण्यासाठी
३. अभ्यंग + स्वेदन : सांधेदुखी आणि कडकपणा न्यून
७. घरगुती आयुर्वेदाचे उपाय (Safe & Practical)
प्रतिदिन कोमट दूध (जायफळ चिमूटभर), तुपाचा मर्यादित वापर (वातशमनासाठी), झोपण्यापूर्वी पायांना तीळतेलाने मालिश, सौम्य योग, प्राणायाम, ध्यान, नियमित चालणे (३० मिनिटे) करावे; अतीतिखट पदार्थ, कॅफीन, उशिरापर्यंत जागरण टाळावे.
८. आहार मार्गदर्शन
अ. काय घ्यावे ? : दूध, तूप, तीळ, बदाम (अस्थी आणि वातासाठी), हिरव्या भाज्या, फळे, सत्त्वयुक्त, गरम आणि ताजे अन्न
आ. काय टाळावे ? : अधिक तिखट, आंबट, तेलकट पदार्थ, जंक फूड (पिझ्झा, बर्गर), प्रक्रिया केलेले अन्न, थंड पेये
९. जीवनशैली आणि मानसिक आरोग्य
नियमित दिनचर्या पाळणे, सकारात्मक विचार आणि ताण नियंत्रण करणे, कुटुंबाचा आधार घेणे अन् संवाद साधणे; ध्यान, तसेच प्राणायाम यांच्याद्वारे मन स्थिर ठेवणे
१०. निष्कर्ष
‘मेनोपॉज’ हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. आयुर्वेदानुसार योग्य आहार, संतुलित दिनचर्या, औषधी उपचार आणि मानसिक स्थैर्य यांच्या साहाय्याने हा काळ सहज अन् निरोगी पद्धतीने पार करता येतो. शरिरातील दोष संतुलित ठेवून आणि धातूंचे पोषण करून स्त्री या नव्या टप्प्याला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
पर्यावरण संरक्षणाला निवडणुकीचे सूत्र बनवणे आवश्यक !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !