१५.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘अवतारांचे सृष्टीच्या संदर्भातील कार्य, दैवी कार्य, तसेच देवतांचे अवतारांच्या संदर्भातील कार्य’ पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1051068.html

६. देवतांच्या संदर्भातील कार्य
६ अ. देवतांना साहाय्य करणे : ‘काही वेळा आसुरी शक्ती इतक्या बलवान होतात की, त्या स्वर्गलोकातील देवीदेवतांना युद्धात पराजित करून त्यांना स्वर्गलोकातून पिटाळून लावतात. अशा वेळी ‘देवतांना साहाय्य करून असुरांचा पराभव करणे आणि देवतांना पुन्हा स्वर्गलोकाची प्राप्ती करून देणे’, यांसाठी भगवंत अवतार धारण करतो.

६ अ १. श्रीकृष्णाने देवतांना साहाय्य करण्यासाठी नरकासुराशी युद्ध करणे : ‘नरकासुराने १६ सहस्र राजकन्यांचे अपहरण करून त्यांना बंदीवासात घातले होते, तसेच इंद्रादी देवतांना पराभूत करून स्वर्गावर अधिपत्य स्थापित केले होते. तेव्हा देवतांना साहाय्य करून १६ सहस्र राजकन्यांची मुक्तता करण्यासाठी श्रीविष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण याने त्याची भार्या सत्यभामा हिच्यासह गरुडावर स्वार होऊन प्राग्ज्योतिषपूर (आताचे गुवाहाटी (आसाम)) या क्षेत्री नरकासुरावर आक्रमण केले. या युद्धात श्रीकृष्णाने नरकासुराचा सरसेनापती मायावी राक्षस मूर याचा निःपात करून शेवटी नरकासुराचा अंत केला आणि १६ सहस्र राजकन्यांची मुक्तता केली. नरकासुराने देवमाता अदितीच्या कानातील सोन्याचे आभूषण आणि इंद्राचे सोन्याचे छत्र चोरले होते. नरकासुराच्या वधानंतर श्रीकृष्णाने या वस्तू संबंधितांना दिल्या.’
(साभार : https://hindi.webdunia.com/mahabharat/narak-chaturdashi-or-narkasur-vadh-story-in-hindi-118110100087_)
६ ई २. परशुरामाने देवतांना शक्तीचा पुरवठा करणे : ‘सप्त चिरंजिवांपैकी एक आणि श्रीविष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम हा महेंद्र पर्वतावर नित्य साधना करून स्वर्गलोकातील देवतांना शक्तीचा पुरवठा करतो.’ (संदर्भ : सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक अन् वेळ : ३१.१.२०२५, दुपारी २ ते २.३०)
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !