
भरूच (गुजरात) – येतील ७०० वर्षे जुन्या असलेल्या जामा मशिदीच्या बंद (सील) केलेल्या तळघरात हिंदूंच्या देवतांच्या प्राचीन मूर्ती, यासह जैन तीर्थंकरांशी संबंधित मूर्तीही आढळल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. यामध्ये मशिदीच्या तळघरात हिंदूंच्या देवतांच्या अनेक प्राचीन मूर्ती, तसेच भगवान मल्लिनाथ (जैन धर्माचे १९ वे तीर्थंकर) यांची मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर विविध हिंदु आणि जैन संघटनांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
🚩 Another Hidden Chapter of History Emerging from Beneath a Mosque?
Idols of Deities Found in the Basement of a 700-Year-Old Jama Masjid in Bharuch, Gujarat!
According to Mahant Muktanand Swami, the discovery strengthens long-standing claims that the site was once "Jain Samari… pic.twitter.com/bIX5LBNKkH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
पुरातत्व विभागाकडून मशिदीची पहाणी !
यानंतर पुरातत्व विभागाच्या पथकाने कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत मशिदीच्या परिसराची पहाणी केली. पाहणीच्या वेळी तळघराचे ध्वनीचित्रीकरण करण्यात आले. तेथे ‘संवत १२१३’ असे कोरलेली एक प्राचीन मूर्ती आणि अनेक खांबांवर पारंपरिक कोरीव कामाचे अवशेष आढळल्याचा दावा केला जात आहे. तथापि या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अंतिम अधिकृत अहवालाच्या आधारेच भविष्यात कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल, असे मानले जात आहे.
जामा मशीद ट्रस्टने दावा फेटाळला !
जामा मशीद ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सरकारी नोंदी, वर्ष १९०७ चे ‘गॅझेट’ आणि वक्फ बोर्डाची कागदपत्रे यांमध्ये मशिदीचा इतिहास स्पष्टपणे नमूद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. धार्मिक भावना भडकवणार्या आणि अनावश्यक वाद निर्माण करणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.
पुरातत्व विभागाने अवैध वजूखाना (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) हटवला !
याच काळात पुरातत्व विभागाने मशिदीच्या आवारात अनुमतीविना बांधलेला अतिरिक्त ‘वजूखाना’ हटवला आहे. तसेच, एका वादग्रस्त प्रवेशद्वार बंद (सील) करण्यात आले आहे. संरक्षित स्मारकांशी संबंधित नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
हे श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान ! – महंत मुक्तानंद स्वामीया प्रकरणी शंकराचार्य मठाचे महंत मुक्तानंद स्वामी म्हणाले की, या शोधामुळे मी पूर्वी केलेल्या दाव्यांना बळकटी मिळाली आहे. हे ठिकाण एकेकाळी जैन धर्माचे ‘जैन समरी विहार’ म्हणून ओळखले जात होते, तसेच हे श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान असल्याचेही मानले जाते. |
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !
ब्रिटन : युवतीवर बलात्कार करणार्या पाकिस्तानी नागरिक शेराज मलिकला १० वर्षांची शिक्षा !
महंमद समीर याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या बर्याच गोळ्या बलपूर्वक दिल्याने तिचा मृत्यू !
Mahalakshmi Kolhapur Suvarna Kalash : श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवला !