भारताचे महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबनाचे प्रकरण
४८ घंट्यांत क्षमा मागून वादग्रस्त विज्ञापन मागे घेण्याची मागणी
व्यावसायिक लाभासाठी राष्ट्रीय वारशाचा अवमान खपवून घेणार नसल्याची स्पष्टोक्ती
मुंबई/नवी देहली – प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ यांचे व्यावसायिक विज्ञापनात अत्यंत हीन पातळीवर विडंबन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर ‘ॲमेझॉनने ४८ घंट्यांत भारतीय जनतेची क्षमा मागून हे वादग्रस्त विज्ञापन तात्काळ मागे घ्यावे’, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘ही मागणी मान्य न झाल्यास ॲमेझॉनच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला प्रविष्ट (दाखल) केला जाईल’, अशी चेतावणीही या नोटिसीत देण्यात आली आहे.
🛑 LEGAL NOTICE,
To,
The Chief Executive Officer / Managing Directorhttps://t.co/an0kuix5ot, Inc. & Amazon Seller Services Private Limited (Amazon India)
Corporate Office:
8th Floor, World Trade Centre, Plot No. C-1, Sector 16,
Noida, Uttar Pradesh – 201301
Also to:
Amazon… pic.twitter.com/6QiuVJRGWS— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) June 12, 2026
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी म्हटले,
१. विज्ञापनात आर्यभट्ट यांच्या वेशातील एका व्यक्तीला उभे करून त्यांना ‘शून्य डिलिव्हरी चार्जेस शोधणारा शास्त्रज्ञ’ अशा उपरोधिक आणि विनोदी स्वरूपात दाखवण्यात आले आहे.
२. ज्या थोर ऋषीतुल्य शास्त्रज्ञाने जगाला ‘शून्या’ची अमूल्य संकल्पना देऊन भारताचा वैज्ञानिक ध्वज जगभरात फडकावला, त्यांना केवळ व्यावसायिक लाभासाठी विनोदी व्यावसायिक पात्र बनवून त्यांची क्रूर थट्टा करणे, हा भारताचा महान ज्ञान-वारसा आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा जाणीवपूर्वक केलेला अवमान आहे.
३. व्यावसायिक लाभासाठी भारतीय संस्कृती आणि हिंदु प्रतीके यांचा अवमान करण्याची ॲमेझॉनची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या आस्थापनाने श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची चित्रे असलेले पायपुसणे, शौचालयाच्या आसनावरील आच्छादने विकणे, तसेच ‘तांडव’ या ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे, असे प्रकार केले आहेत. तेव्हा तीव्र विरोधानंतर आस्थापनाला क्षमा मागावी लागली होती.
🚨 Legal Notice to Amazon India!@HinduJagrutiOrg through Advocate @SachdevaAmita has served a legal notice to @amazonIN for the shameful mockery of India's great mathematician, Aryabhata, in a recent ad.
Demands: Immediate withdrawal of the ad and a public apology within 48… https://t.co/YnR4znzApZ pic.twitter.com/izle1KPL9Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
४. व्यावसायिक लाभासाठी भारतीय राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचे हे कृत्य सुधारित भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे), कलम १९६आणि १९७ (समाजात तेढ निर्माण करून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणे) अन् कलम ३०२ (धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) अन्वये थेट फौजदारी आणि दिवाणी कारवाईस पात्र ठरते.
५. वादग्रस्त विज्ञापन यू-ट्यूब, इन्स्टाग्राम, एक्स आदी माध्यमांतून कायमचे हटवावे, आस्थापनाने त्याच्या अधिकृत समाजमाध्यमांवर, त्याच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आणि देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीर अन् बिनशर्त क्षमा मागावी, तसेच भविष्यात राष्ट्रीय प्रतीके वा राष्ट्रपुरुष यांचा अवमान न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशा ठाम मागण्याही करण्यात आल्या आहेत.
आर्यभट्ट का अपमान : अमेज़न भारत से क्षमा मांगे !#Boycott_Amazon
महान भारतीय गणितज्ञ एवं खगोलशास्त्री Aryabhata का अपमान करने के प्रकरण में Amazon को भारत से सार्वजनिक रूप से क्षमा याचना करनी चाहिए।
पूर्व में भी अमेज़न द्वारा जूतों तथा शौचालय-संबंधी उत्पादों पर हिन्दू… pic.twitter.com/LoclZqvwu7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
(वरील चित्र/व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
‘ॲमेझॉन’वर बहिष्कार घालण्याची मोहीम !संबंधित विज्ञापनामुळे देशभरातील राष्ट्रप्रेमी नागरिक संतप्त झाले असून सामाजिक माध्यमांवर ‘ॲमेझॉन’वर बहिष्कार घालण्याच्या (#Boycott_Amazon) ऑनलाईन मोहीमेचा वेगाने प्रसार होत आहे. |

भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार