‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. हिंदूंवर खोट्या ‘सर्वधर्मसमभावा’चे जोखड
‘आपल्याला लहानपणापासून ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला गेला आहे. त्याचे अनुकरण आपण आजतागायत करत आलो आहोत. या तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’मुळे ‘हिंदु राष्ट्रा’ची काय हानी झाली आहे, ती आपण पहात आहोत. आपले शत्रू ‘सर्वधर्मसमभावा’च्या आडून आपल्यावर कसे वार करत आहेत, याचे एक चांगले उदाहरण मला पहायला मिळाले. महाराष्ट्रात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखीचा सोहळा असतो. काही वर्षांपूर्वी ही पालखी आमच्या भागात आली होती, तेव्हा त्या भागातील रस्त्यात असणार्या दर्गावाल्या लोकांनी त्यांची हिरवी चादर माऊलींच्या पालखीवर चढवली. बहुतांश हिंदू सर्वधर्मसमभाव मानतात. त्यांना वाटते, ‘तीही माणसेच आहेत. त्यामुळे त्यांनी असे केले, तर काय झाले ?’ येथेच हिंदूंची फसगत होते. यामागे आपण सर्वधर्मसमभाव कधी सोडूच नये, हा त्यांचा डाव असतो. याच ठिकाणी त्यांचे ताबूत किंवा मिरवणूक निघाली असती आणि त्यावर आपण हिंदूंनी हळद-कुंकू लावून पूजा करण्याचे ठरवले असते, तर त्यांनी आपल्याला अनुमती दिली असती का ? खरे सांगायचे, तर ते आपल्याला जवळही येऊ देत नाहीत. ‘सर्वधर्मसमभाव’ हा ईश्वराच्या आशीर्वादाचा एक हात असेल, तर दुसरा हात शस्त्रधारी आहे. आता आपल्याला हा सर्वधर्मसमभाव सांभाळतच वैध मार्गाने उत्तर देण्याची आवश्यकता आहे. शस्त्र केवळ धातूचेच असते, असे नाही, तर वाणीचेही असू शकते. आपली वाणीच अशी असली पाहिजे की, आपल्या शस्त्ररूपी वाणीचेही त्यांना भय वाटले पाहिजे.
२. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात धर्मांध तरुणांची कायदेशीर सिद्धता

एकट्या व्यक्तीचे कुणी ऐकून घेत नाही. त्यासाठी आपण संघटित होऊन कार्य केले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती तेच कार्य करत आहे. ‘लव्ह जिहाद’रच्या प्रकरणात धर्मांध मुलांची पूर्ण सिद्धता असते. कायद्याने आमचे हात बांधले आहेत. त्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही, केवळ हिंदु मुलींचे समुपदेशन (कौन्सिलिंग) करू शकतो. समजा एखाद्या अल्पवयीन मुलाच्या हातून काही गुन्हा घडला, तर त्याला बालसुधारगृहात पाठवले जाते; परंतु लव्ह जिहादमध्ये अडकेली मुलगी पोलीस ठाण्यात येते, तेव्हा तिच्यासाठी असा एखादा कायदा का बनवला जात नाही ? त्या मुलीला तिचे आई-वडिल त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतील, असा कायदा बनवला पाहिजे. जर तिला घरी पाठवता आले, तर आपण तिला वाचवू शकतो; परंतु ते लोक एवढ्या सिद्धतेने सर्व कागदपत्रे समोर ठेवतात की, पोलीस अधिकारी म्हणतात, ‘मॅडम आम्ही काही करू शकत नाही, सर्व कायदेशीर कागदपत्र सिद्ध आहेत.’
३. धर्मांधांची तिसर्या महायुद्धासाठी मोठी सिद्धता
नॉस्ट्रेडॅम्स प्रख्यात भविष्यवेत्ता होता. त्याने ४५० वर्षांपूर्वी लिहून ठेवल्याप्रमाणे पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध घडले. त्याने तिसर्या महायुद्धाविषयीही लिहून ठेवले आहे. आता आपण तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हे तिसरे महायुद्ध होणार, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यासाठी प्रत्येक जण काहीतरी सिद्धता करत आहे; परंतु मला वाटते की, या युद्धासाठी हिंदूंच्या शत्रूंनी पुष्कळ मोठी सिद्धता करून ठेवली आहे. या तिसर्या महायुद्धाचे पुष्कळ दुष्परिणाम होणार आहेत; परंतु त्यानंतर विश्वात केवळ हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ असेल. या पद्धतीने आपल्याला कार्य करायचे आहे.
भारताची स्थापना ही धर्माच्या पायावर झाली आहे, हे शत्रूला ठाऊक आहे. त्यामुळे जर धर्म तोडायचा असेल, तर त्यापूर्वी आपल्या अध्यात्माला तोडणे आवश्यक आहे, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे ते लोक प्रत्येक ठिकाणी आपल्या आध्यात्मिकतेला तोडण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. त्यासाठी ते साधू-संतांवर गुन्हे नोंदवणे, त्यांना अटक करणे, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर आक्रमण करणे इत्यादी आघात करत आहेत. या सर्व आक्रमणांना तोंड देण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे.’
– डॉ. वनमाला शिंदे, समुपदेशक, पुणे.
हिदु धर्माचा झेंडा !
‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !
‘कॉकरोच’ना ‘डायनासॉर’ म्हणून रंगवले, तरी देशात क्रांती होणे अशक्य !
आदिवासी कि वनवासी ?
केरळम्मधील दीपप्रज्वलनाचा वाद : राष्ट्रीय व्यक्तीमत्त्वाचा आत्मा संस्कृती कि धर्म ?
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !