जेजुरी (पुणे) जवळील बेलसर येथे छत्रपतींच्या सरदारांच्या ऐतिहासिक भूमीवर धर्मांधांचे अतिक्रमण !

  • हिदूंच्या धार्मिक जागेत अवैध दफनभूमी आणि मटणाच्या मेजवान्या !

  • प्रशासनाकडून दुर्लक्ष; ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या पत्राला दाखवली केराची टोपली !

नागपंचमी साजरी करतांना

बेलसर (जिल्हा पुणे) – स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार महिमाकार खंडोजी पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी सरदार कावजी बिन मल्हारजी खासनीस (पाटील-गरूड) यांच्या शौर्याने पावन झालेल्या बेलसर येथील ऐतिहासिक खंदकाच्या जागेवर मुसलमान समाजाकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे.

अतिक्रमण करून बांधलेला दर्गा

ही जागा हिंदूंचे वंशपरंपरागत जे धार्मिक कार्यक्रम होतात त्यासाठी वापरण्यात येत असतांना, तसेच येथे ऐतिहासिक वारसदार असतांनाही धर्मांधांनी या पवित्र जागेवर ताबा मिळवण्याचा ‘लँड जिहाद’च्या माध्यमातून प्रयत्न चालवला आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे मृतदेह दफन केले जात असून बाहेरील मुसलमान येथे येऊन मटणाच्या मेजवान्या करत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

आपटा पूजन करतांना हिंदू

वर्ष १९५४ मधील महसूल विभागाच्या गोंधळाचा अपलाभ घेत ही जागा बळकावण्याचे कारस्थान चालू असून तहसीलदारांनी दिलेल्या शासकीय मोजणीच्या आदेशालाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

जेजुरी पोलिसांना दिलेले निवेदन

या संदर्भात पाटील-गरूड यांनी जेजुरी पोलिसांना पुन्हा एकदा निवेदन दिले आहे. ऐतिहासिक जागेचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी या जागेवरील बेकायदेशीर कबरी अन् अतिक्रमणे तात्काळ हटवून संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत. अन्यथा ‘सकल हिंदु संघटने’च्या वतीने कठोर पावले उचलली जातील, अशी चेतावणी दिली आहे.

मटणाच्या मेजवान्या केलेली जागा

(हिंदूंची ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे पद्धतशीरपणे गिळंकृत करण्याचे हे ‘लँड जिहाद’चे सुनियोजित कारस्थान आहे. आधी एका रात्रीत कबर उभी करायची, नंतर तिथे उरूस (मुसलमानांची मिरवणूक) भरवायचा आणि हळूहळू ती संपूर्ण जागाच वक्फ बोर्डाच्या किंवा मुसलमान समाजाच्या नावावर करून हिंदूंचा वारसा पुसून टाकायचा, ही धर्मांधांची ठरलेली रणनीती आहे. बेलसरमध्ये आज नेमके हेच घडत आहे. प्रशासनाने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ही सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ भुईसपाट करावीत ! – संपादक)