लांजा तालुक्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण : शेकडो हिंदू पोलीस ठाण्यावर धडकले

लांजा – तालुक्यातील शिपोशी पंचक्रोशीत एका हिंदु तरुणीला मुसलमान तरुणाने जाळ्यात ओढून तिला पळवून नेल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणामुळे शिपोशी पंचक्रोशी आणि तालुक्याती शेकडो हिंदु बांधव संतप्त झाले असून त्यांनी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन सादर केले. संबंधित मुसलमान तरुणासह त्याला साहाय्य करणार्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१. शिपोशी येथील एका मुसलमान तरुणाने पीडित हिंदु तरुणीशी प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिला विविध प्रलोभने दाखवून, तिच्या मनात कुटुंबियांविषयी, तसेच हिंदु धर्माविषयी विष कालवून तिची फसवणूक केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
२. सध्या हिंदु तरुणी या तरुणाच्या प्रचंड दबावाखाली असून ती दबावाखालीच जबाब देत आहे. देशभरातील लव्ह जिहादच्या भीषण घटनांची पार्श्वभूमी पहाता या तरुणीच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील हिंदु धर्मियांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
३. या संवेदनशील प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
४. या संपूर्ण प्रकरणात मुसलमान तरुणाला लांजा येथील काही स्थानिकांनी साहाय्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या सर्वांचीही कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
मुसलमानांनी पूर्वजांच्या परंपरा स्वीकारल्यास त्यांना हिंदु राष्ट्रात कोणताही धोका नसेल ! – Yogrishi Ramdev baba
Gyanvapi Mathura Sambhal Dispute : काशी, मथुरा आणि संभल येथील मंदिर-मशीद वादामध्ये सर्वाेच्च न्यायालयाचा मध्यस्थीचा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी फेटाळला