पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर

कोल्हापूर, १२ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी अशा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर दर्शनाखाली खुले झाले आहे. कोल्हापूर येथे राजाराम बंधार्‍याजवळ पंचगंगा नदीची पाणीपातळी केवळ १५ फूट नोंदवली गेली. पाण्याखाली गेलेले बहुतांश बंधारे खुले झाले असून आता केवळ ९ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील बंद झालेले बहुतांश एस्.टी.चे मार्गही खुले झाले असून बहुतांश ठिकाणची बसवाहतूक सुरळीत झाली आहे.

राधानगरी धरणात ८.३६ टी.एम्.सी. पाणीसाठा असून वारणा धरणात ३४.४० टी.एम्.सी. पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व लघुप्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे.