
पुणे, १२ जुलै (वार्ता.) – आषाढी वारीच्या पावन वातावरणात लाखो वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड नामघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतांना, दिवे घाट येथे आकाशात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन घडले. हा विलक्षण निसर्गाविष्कार पाहून वारकरी भावविभोर झाले. अनेक ज्येष्ठ वारकर्यांनी ‘वारीत असा योग यापूर्वी कधी अनुभवला नव्हता’, अशी भावना व्यक्त केली आणि याला श्रीविठ्ठलाची कृपा अन् मंगल आशीर्वाद मानले. वारी मार्गावरील सासवड परिसरात विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आकाशात निर्माण झालेल्या या पूर्ण इंद्रधनुष्याचे दर्शन अनेक वारकरी आणि भाविक यांनी त्यांच्या भ्रमणभाषवर चित्रीत केले. काही क्षण टिकलेल्या या मनोहारी दृश्याने संपूर्ण परिसर भक्तीमय आणि आनंदमय झाला.

अध्यात्मशास्त्रानुसार इंद्रधनुष्य हे निसर्गातील ७ रंगांचे दैवी संतुलन आणि सृष्टीतील चैतन्याचे प्रतीक मानले जाते. संपूर्ण इंद्रधनुष्य किंवा इंद्रवज्राचे दर्शन हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. भक्तीभावाने केलेले नामस्मरण, सामूहिक प्रार्थना आणि सात्त्विक वातावरण यांमुळे निर्माण होणार्या दैवी चैतन्याचे हे शुभ संकेत असल्याची श्रद्धा अनेक भाविकांनी व्यक्त केली. या दुर्मिळ निसर्गदर्शनाने यंदाच्या आषाढी वारीला एक विशेष आध्यात्मिक आणि अविस्मरणीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू !
जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार ! – मुकुंद दातार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सिद्ध !
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !