
मॉस्को (रशिया) – अमेरिकेची एकाधिकारशाही झुगारून जग आता बहुध्रुवीय झाले आहे. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे ‘ब्रिक्स’ संघटना. यावर प्रकाश टाकतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले की, गेल्या ५ वर्षांत जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनापैकी जवळपास अर्धा (४९ टक्के) वाटा ‘ब्रिक्स’ देशांचा आहे. ही आकडेवारी दर्शवते की, उदयोन्मुख बाजारपेठा आता जागतिक स्तरावर स्वतःला एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून प्रस्थापित करत आहेत. पुतिन २९ व्या ‘सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम’च्या सत्राला संबोधित करत होते.
पुतिन यांनी मांडलेली ५ महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. ‘ब्रिक्स’च्या स्थापनेपासून जागतिक वस्तू व्यापारातील त्यांचा वाटा दुप्पट झाला आहे. सदस्य देशांमधील परस्पर व्यापाराने १ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.
२. ब्रिक्स देश आता केवळ पारंपरिक व्यापार किंवा वस्तू यांच्या निर्यातीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जागतिक उच्च-तंत्रज्ञान निर्यातीतील त्यांचा वाटा एक तृतियांशाहून अधिक झाला आहे.
३. जागतिक सॉफ्टवेअर उद्योगातील भारताचे अत्यंत सशक्त स्थान आहे.
४. चीन कृत्रिम बुद्धीमत्तेसंदर्भातील संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.
५. रशिया डिजिटल प्लॅटफॉर्म, वित्तीय तंत्रज्ञान आणि अणूऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे.
‘ब्रिक्स’ काय आहे ?
‘ब्रिक्स’ हा प्रादेशिक घटकांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणार्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे. याचे स्थापनावर्ष २००६ असून प्रारंभी ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे त्याचे सदस्य होते. वर्ष २०२४ मध्ये यात काही आफ्रिकी आणि आशिया खंडांचे देशही जोडले गेले. |
‘बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था’ प्रस्थापित करण्यासाठी चीन आणि रशिया कटीबद्ध ! – चीन
कार्यक्रमाला संबोधित करतांना चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांनी जागतिक प्रशासनाच्या न्याय्य व्यवस्थेची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, सार्वभौम समानता, आंतरराष्ट्रीय कायदा आणि खर्या अर्थाने बहुक्षीय सहकार्य यांवर आधारित ‘बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था’ प्रस्थापित करण्यासाठी चीन अन् रशिया कटीबद्ध आहेत.

Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !