Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र

अयोध्येतील श्रीराममंदिरातील दान चोरीचे प्रकरण

चंपत राय

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दान चोरीविषयी विशेष अन्वेषण पथकाने २२ जूनला सरकारला प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला, तसेच त्यात ८ जणांना आरोपी बनवण्यात आले. यानंतर आता श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. त्यांच्यासह न्यासाचे प्रमुख सदस्य अनिल मिश्रा यांनीही त्यागपत्र दिले. विहिंपचे राष्ट्रीय सरचिटणीस बजरंग लाल बागरा यांनी चंपत राय यांचे त्यागपत्र स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. सध्या विहिंपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी अयोध्येत उपस्थित आहेत.

८ पैकी ७ आरोपींना अटक

या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातील ८ पैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या सूचीत चंपत राय यांचे निकटवर्तीय आणि चालक टिन्नू यादव याचाही समावेश आहे.