
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पुन्हा एकदा भारतासह अनेक मोठ्या देशांच्या उत्पादनावर १० टक्के किंवा त्याहून अधिक अतिरिक्त आयातशुल्क लादण्याचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. ज्या देशांत सक्तीने मजुरी करायला लावून माल उत्पादित केला जातो, त्या मालावर शुल्क लादले जाईल, असे अमेरिकेने घोषित केले आहे. या निर्णयाचा फटका भारतासह ६० देशांना बसणार आहे.
पाकवर १० टक्के आयात शुल्क लादणार
पाकिस्तान, कॅनडा, मेक्सिको, तैवान आणि यूके यांच्यासह काही देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले जाईल. चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त शुल्क लादण्यात येणार आहे. नवे आयातशुल्क तात्काळ लागू केले जाणार नाही. लोकांच्या हरकती आणि सूचना मागवल्यानंतर त्यावर कृती करण्यात येईल.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !