‘१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी, मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञाच्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ भव्य दिव्य आणि चैतन्याच्या स्तरावर होणार’, याची निश्चिती असणे
मुंबईमध्ये एखादा मोठा जाहीर कार्यक्रम घ्यायचा असल्यास पुष्कळ अडचणी आणि मर्यादा येतात. कार्यक्रम करण्यासाठी पैसे, सत्ता आणि राजकीय पाठबळ यांची आवश्यकता असते. सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक आणि सेवाभावी संस्थेला कार्यक्रमाचे आयोजन करायला कठीण जाते; मात्र ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ या उक्तीनुसार ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हा नियोजित महायज्ञ यशस्वी करतीलच’, असे मला जाणवत होते. ‘मी आतापर्यंत अनुभवलेले मुंबईतील कार्यक्रम आणि मोहिमा यावरून हा महायज्ञ भव्य दिव्य आणि चैतन्याच्या स्तरावर होईल’, याची मला निश्चिती होती.

२. श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहात असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. मी हा महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहात असूनही ‘मी कार्यक्रमस्थळी स्थुलातून उपस्थित आहे’, असे मला जाणवत होते. मला यज्ञकुंडातून निघणार्या धुराचा सुगंध येत होता आणि ज्वालांची धग (उष्णता) जाणवत होती.
आ. ‘महायज्ञ उच्च लोकात होत आहे’, असे मला जाणवत होते.
इ. ‘महायज्ञातील पूजा, आहुती देणे इत्यादी पुरोहित करत नसून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेच्या वतीने यजमान सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ करत आहेत’, असे मला जाणवले.
ई. ‘हा महायज्ञ, सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश, उपस्थित संत आणि सद्गुरु, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व’ इत्यादीमुळे कार्यक्रम स्थळी तेज अन् चैतन्य ओसंडून वहात होते. त्याचा परिणाम जगभरात होत आहे’, असे मला जाणवले.
३. श्री राजमातंगी महायज्ञ झाल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने माझे स्वभावदोष आणि अहं यांची महायज्ञात आहुती दिली गेली आहे. माझ्या मनाची शुद्धी झाली. मला पुष्कळ हलके, उत्साही आणि आनंदी वाटू लागले.
आ. माझा नामजप अधिक आवडीने, तळमळीने आणि भावपूर्ण होऊ लागला.
इ. ‘मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे हिंदु राष्ट्रात आहे’, याची जाणीव मला अधिक प्रमाणात होऊ लागली.
ई. मी यज्ञस्थळी स्थुलातून उपस्थित नव्हतो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, याची अनुभूती दिली.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या वेळी मला सूक्ष्मातील अनुभूती आल्या. मी चैतन्य आणि आनंद अनुभवला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), वय ७९ वर्षे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०२६)

१. यज्ञाच्या सेवांविषयी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी

अ. श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवांविषयी ४.५.२०२६ या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत, वय ५६ वर्षे) एका सत्संगात साधकांना मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी मला त्या दोघींच्या उजव्या बाजूला पांढर्या शुभ्र वस्त्रात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्म रूपात आसंदीत विराजमान झालेले दिसले.
आ. त्या वेळी मला त्या दोघींच्या डाव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवत होते.
इ. सर्व संतांच्या मागे श्री राजमातंगीदेवी सूक्ष्म रूपात सर्व साधकांना आशीर्वाद आणि चैतन्य प्रदान करत होती.
ई. सत्संगात उपस्थित असलेले श्री. हेमंत पुजारी यांना मी विचारले, ‘‘सत्संग चालू असतांना तुम्हाला काय जाणवले ?’’ तेव्हा त्यांनाही अशाच प्रकारच्या अनुभूती आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
२. यज्ञस्थळी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभ हस्ते भूमीपूजन चालू असतांना
अ. ७.५.२०२६ या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन केलेल्या ठिकाणी (नर्दुल्ला टँक मैदानात) सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभ हस्ते भूमीपूजन करण्यात आले. तेव्हा मला पूजेच्या ठिकाणी सूक्ष्मातून श्री राजमातंगीदेवीचे अस्तित्व जाणवत होते.
आ. ‘देवीसह अनेक ऋषिमुनी आणि संत सूक्ष्म रूपाने तेथे उपस्थित राहून नियोजित महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची जणू ग्वाही देत आहेत’, असे मला जाणवले.
इ. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या रूपाने साक्षात् देवीच श्री गणेश आणि भूमीदेवता यांना आवाहन करत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते.
ई. पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर यांनी पृथ्वी, शेषनाग, वराह आणि कूर्म या देवतांना आवाहन केल्यावर मला पूजेच्या स्थळी सूक्ष्मातून त्या देवतांचेही अस्तित्व जाणवत होते.’
– श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), मुंबई (२१.५.२०२६)
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !