‘१७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ झाला. २८.५.२०२६ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात या महायज्ञासाठी उपयोगात आणलेल्या साहित्याचे प्रदर्शन लावले होते. आम्ही प्रतिदिन सकाळी परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज पूर्वी रहात असलेल्या खोलीच्या समोरील मोकळ्या जागेत योगासने करतो. त्या ठिकाणी हे चैतन्यमय प्रदर्शन लावले होते. ते प्रदर्शन पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्री राजमातंगीदेवीसाठी बनवलेले मखर पहातांना श्री राजमातंगीदेवीचे सूक्ष्मातून दर्शन होणे आणि ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ चालू आहे’, असे वाटणे
प्रथम माझे लक्ष सुशोभित अशा चैतन्यदायी रिकाम्या मखराकडे गेले. त्या वेळी मला तेथे दैदीप्यमान अशा श्री राजमातंगीदेवीचे सूक्ष्मातून दर्शन झाले आणि मी कृतार्थ झालो. तेव्हा ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ चालू आहे’, असे मला वाटले. सुंदर अशा मखराच्या समोर देवीचे सुंदर यंत्र ठेवले होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दीपप्रज्वलन करण्यासाठी उपयोगात आणलेल्या २ मातीच्या पणत्या पुष्कळ सात्त्विक आणि चैतन्यदायी दिसत होत्या.
३. यज्ञवेदीसाठी उपयोगात आणलेल्या विटांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य जाणवत होते आणि त्या सुंदर दिसत होत्या.
४. ‘यज्ञाच्या ठिकाणी वापरलेले ३ कळस, श्री राजमातंगीदेवीला नेसवलेली साडी, सोरटी सोमनाथ येथील दिव्य लिंगांचे अंश ठेवण्यासाठी केलेला देव्हारा’ यांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते.

५. यज्ञासाठी उपयोगात आणलेल्या सर्व वस्तू पुष्कळ चैतन्यमय आणि सुंदर वाटणे
यज्ञासाठी उपयोगात आणलेले इतर साहित्य आणि ते अभूतपूर्व प्रदर्शन पाहून मला ‘तेथून जाऊ नये’, असे वाटत होते. त्या सर्व वस्तू पुष्कळ चैतन्यमय आणि सुंदर वाटत होत्या.
६. प्रदर्शनाच्या ठिकाणचे वातावरण शांत वाटत होते.
तिन्ही लोकांचा आणि संपूर्ण जगाचा विचार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले अन् त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी माझ्याकडून आपोआप कृतज्ञता व्यक्त झाली.’
– (पू.) सदाशिव (भाऊ) परब (सनातनचे २६ वे संत, वय ८६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.५.२०२६)
श्री राजमातंगी महायज्ञाचे थेट प्रक्षेपण पहातांना सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांना आलेल्या अनुभूती !

‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. यज्ञस्थळी जेथे श्री राजमातंगीदेवीची स्थापना केली होती, तेथे मला सूक्ष्मातून भगवान श्रीविष्णु आणि श्री कालिकादेवी यांचे दर्शन झाले.
२. यज्ञाच्या सांगतेच्या वेळी मला सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले.’
– (पू.) शंकर गुंजेकर (सनातनचे ५६ वे संत, वय ६३ वर्षे), बेळगाव, कर्नाटक. (१४.६.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे