सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य

जयपूर (राजस्थान) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने सनातन संस्थेने ‘रामराज्य निर्मिती’च्या अंतर्गत राजस्थानमध्ये विविध ठिकाणी प्रार्थना आयोजित केल्या होत्या. त्या अंतर्गत जयपूर येथील सुभाष चौकातील काळे हनुमान मंदिर, चांदपोल येथील श्री रामचंद्र मंदिर, अजमेर येथील वैशालीनगरमधील खाटू श्याम मंदिर आणि सोजत (जिल्हा पाली) शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे रामराज्याच्या स्थापनेसाठी संकल्प करून सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये सनातन संस्थेच्या साधिका आशा राठी, शुभ्रा भार्गव, अजमेर येथील साधक चंद्र लालवाणी, सोजत येथील दीपक लढ्ढा यांच्यासह अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.


FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !