स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘देवीदेवतांचे आणि ऋषींचे लाखो वंशज आज पशूतुल्य बनले आहेत’, हे बघून तुमच्या हृदयाला पीळ पडतो का ? कोट्यवधी लोक आज भुकेने तडफडत आहेत. नव्हे ‘शेकडो वर्षांपासून त्यांची तडफड चालली आहे’, हे पाहून तुमच्या हृदयाला घरे पडतात का ? ‘अज्ञानाच्या काळ्याकुट्ट मेघांनी आपला समस्त देश झाकाळून गेला आहे’, हे बघून तुमचे हृदय पिळवटून निघते का ? या गोष्टी तुम्हाला अगदी बेचैन करून सोडतात का ? या गोष्टींमुळे तुमची झोप उडून गेली आहे का ? या भावना तुमच्या नसानसांतून सळसळत आहेत का ? तुमच्या अगदी रक्तात भिनल्या आहेत का ? तुमच्या हृदयस्पंदनाशी एकरूप झाल्या आहेत का ? त्यांनी तुम्हाला अगदी वेडे करून सोडले आहे का ? विनाशाच्या या दुःखाने तुम्हाला पूर्णपणे ग्रासले आहे का ? आणि ही स्थिती दूर करण्यासाठी तुम्ही आपल्या नावलौकिकावर, स्त्री-पुत्रांवर, धनदौलतीवर, एवढेच नव्हे, तर स्वतःच्या शरिरावरही पाणी सोडले आहे का ? हे सर्व तुम्ही केले आहे का ? देशभक्त होण्याची ही पहिली पायरी, अगदी पहिलीच पायरी होय.’- स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !