उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या त्युनी येथे सामाजिक माध्यमावर हिंदु नावाची बनावट ओळख सिद्ध करून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करणार्या अनस नावाच्या मुसलमान तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ‘अंश राणा’ नावाच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्याद्वारे १६ वर्षीय हिंदु किशोरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात स्थानिक भाजी विक्रेता महंमद जुनैद याने आरोपीला साहाय्य केले आणि कुठल्याही ओळखपत्राविना हॉटेलमध्ये खोली मिळवून दिली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि रुद्रसेना देवभूमी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ व्यापार्यांनी त्युनीचा मुख्य बाजार पूर्णपणे बंद ठेवला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !