देहली येथे झाली ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक
(क्वाड देश म्हणजे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. ४ देशांचा हा गट अमेरिकेने प्रामुख्याने चीनचे या क्षेत्रातील वर्चस्व अल्प करण्यासाठी बनवलेला गट आहे.)
नवी देहली – इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा परिणाम ऊर्जा सुरक्षेवर स्पष्टपणे दिसत आहे. समुद्री मार्गांचे स्वातंत्र्य राखणे आवश्यक आहे आणि ‘क्वाड’ देश कोणत्याही प्रकारचा टोल (शुल्क) लावण्यास विरोध करतात. क्वाड सदस्य देश केवळ चर्चेवर नव्हे, तर ठोस निष्कर्षांवर लक्ष केंद्रित करत आहेत, असे सूत्र ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी येथे झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले. या बैठकीत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले होते. अमेरिकेकडून मार्को रुबियो, जपानकडून तोशिमित्सु मोतेगी आणि ऑस्ट्रेलियाकडून पेनी वोंग उपस्थित होत्या.
या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी आतंकवादाच्या सूत्रावर बोलतांना सांगितले की, या विरोधात शून्य सहनशीलता असावी. ज्या देशांवर आतंकवादी आक्रमणे होतात, त्यांना स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार आहे.

बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !