
कोल्हापूर – हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ रहित करावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.

१. हुपरी येथे हे निवेदन नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ यांनी स्वीकारले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री अनिल कडाकणे आणि सोनवणे, हिंदु महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोरे, विश्व हिंदु परिषद जिल्हा सहमंत्री निळकंठ माने, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि महेंद्र अहिरे, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, सर्वश्री शुभम पांढरबळे, गोविंद नेमिष्टे, संकल्प मुधाळे, अभि कांबळे, विक्रम सावंत, शिवाजी शेटके, नितीन खेमलापुरे, अमित सोनवणे, दिग्विजय घोरपडे, मनोज पाटील, रविराज ससे, सचिन माळी उपस्थित होते.

२. इचलकरंजी येथे हे निवेदन प्रांताधिकारी श्री. दीपक शिंदे यांनी स्वीकारले. निवेदन स्वीकारल्यावर प्रांताधिकार्यांनी उपस्थितांशी विस्तृत चर्चा केली. या वेळी दोन स्थानिक मंदिरांनी त्यांच्या समस्या मांडल्यावर त्या संदर्भात यावर योग्य मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले, तसेच महाराष्ट्र देवस्थान इनाम कायद्याला मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी यांनी विरोध केल्यास हा कायदा रहित होऊ शकतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, गुरव समाजाचे तालुकाध्यक्ष श्री. शीतल गुरव, ‘श्री व्यंकटेश बालाजी मंदिरा’चे विश्वस्त श्री. सुहास कुलकर्णी, ‘माणगाव मारुति मंदिरा’चे विश्वस्त श्री. कृष्णा गुरव, ‘कबनूर मारुति मंदिरा’चे विश्वस्त श्री. राहुल गुरव, विठ्ठल मंदिराचे सेवक श्री. अण्णा परीट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, सौ. साधना गोडसे, श्री. आकाण रणदिवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. रवींद्र धनगर, ‘एकम सनातन भारत दला’चे सदस्य श्री. विनोद ओझा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अनिल साळोखे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सूर्यकांत ओझा, सर्वश्री पांडुरंग चव्हाण, नंदकिशोर ऐडके, सोमेश तेलवे, सुभाष गुरव, अतिग्रे येथील हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. तानाजी पाटील आणि श्री. आनंद पाटील उपस्थित होते.
३. चंदगड येथे हे निवेदन नायब तहसीलदार श्री. प्रकाश जोशीलकर यांनी स्वीकारले.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !