‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला जिहादचे स्वरूप
भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशियामध्ये क्रिकेटला एक वेगळे मानाचे स्थान आहे. भारतात क्रिकेटला धर्म समजला जातो. ‘क्रिकेट जिहाद’ नावाची एखादी गोष्ट या खेळात असू शकते, असा आपण कधी विचारही केला नव्हता; पण ते सत्य असून वास्तवात आहे. भारत-पाकिस्तानचा सामना एखाद्या युद्धासारखा असतो. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘भारताविरुद्ध आमचा क्रिकेटचा सामना होतो, तेव्हा तो भारतियांसाठी खेळ असेल; परंतु आमच्यासाठी युद्धच असते, आमच्यासाठी तो एक जिहाद असतो’, असे म्हटले होते.
अधिवक्ता विनीत जिंदाल यांचा परिचय

अधिवक्ता विनीत जिंदाल हे देहली उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय येथे वकिली करतात. ते विविध वृत्तवाहिन्यांवर निर्भयतेने राष्ट्र-धर्मविरोधी विषयांचे खंडण करतात. त्यांनी पाकिस्तानमध्ये तोडल्या जाणार्या हिंदु मंदिरांविषयी पाकिस्तानी सर्वाेच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाला पत्र लिहून ती मंदिरे परत बांधण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्य न्यायाधिशांनी तोडण्यात आलेली मंदिरे पुन्हा बांधण्याचा आदेश दिला.
२. खेळाला जिहाद समजणारी पाकिस्तानची काही उदाहरणे
अ. वर्ष १९७८ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये हॉकीचा सामना झाला. त्यात पाकिस्तानने भारताचा ०-८ गोलने पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानच्या संपूर्ण हॉकी संघाने मैदानात नमाजपठण केले आणि ‘आम्ही हिंदूंना हरवले’, असे वक्तव्य केले. या कृत्यावरून खेळाकडे जिहाद म्हणून पहाण्याचा पाकिस्तानचा उद्योग पुष्कळ आधीपासून चालू आहे, हे दिसून येते.
आ. विश्वचषकाचा सामना जिंकल्यावर किंवा धावांचे शतक पूर्ण केल्यावर पाकिस्तानचा खेळाडू या गोष्टी भर मैदानात ‘फिलीस्तान’ किंवा ‘इस्लाम’ यांना अर्पण करतो. हाही एक प्रकारचा जिहादच आहे.
इ. पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने वेस्ट इंडिजचा प्रख्यात खेळाडू ब्रायन लारा याला इस्लाम स्वीकारण्याचे आमीष दिले होते.
ई. क्रिकेटमधील जिहादचा इतिहास पुष्कळ दीर्घ आहे. युसुफ युहाना हा पाकिस्तानचा ख्रिस्ती; पण एक उमदा खेळाडू होता. इस्लाम हा केवळ एक पंथ आहे एवढेच त्याला ठाऊक होते. एक दिवस अकस्मात् त्याने इस्लाम पंथ स्वीकारल्याचे समोर आले. पूर्वी तो दाढी करत होता; पण नंतर लांबलचक दाढी वाढवू लागला. पुढे त्याने इस्लामचे उदात्तीकरण पुष्कळ प्रमाणात केले.
उ. इंझमाम उल् हक पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. त्याच्या कार्यकाळात क्रिकेट संघात इस्लामला पाकिस्तानच्या बाजूने अंतर्भूत केले, जे कधीही कुणाकडून झाले नाही. त्या वेळी पाकिस्तान क्रिकेट चमूत जे बिगर मुसलमान खेळाडू होते, त्यांना इस्लाम पंथानुसार आचरण करणे बंधनकारक केले गेले. ‘त्यांनी इस्लाम पंथानुसार आचरण केले, तरच त्यांना संघात ठेवले जाईल, अन्यथा संघाच्या बाहेर करण्यात येईल’, अशी तंबी देण्यात आली होती. त्यानंतर पुढे जाऊन पाकिस्तानी संघाने जगभरात इस्लामला क्रिकेटच्या माध्यमातून कसे वाढवता येईल, याचे कुशलतेने प्रयत्न केले. हे काम थांबवण्याचे प्रयत्न एकाही देशाने वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने किंवा भारत क्रिकेट नियामक मंडळाने केले नाही.

३. हिंदुविरोधी पाकिस्तानी क्रिडा पत्रकार जैनाब अब्बास हिचे विश्वचषक स्पर्धेतून पलायन
वर्ष २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी पाकिस्तानातून जैनाब अब्बास ही क्रिडा पत्रकार तथा क्रिकेट समालोचक उपस्थित होती. ती मैदानात समालोचन करण्यासाठी आली असता अचानकपणे तिची ‘एक्स’ समाजमाध्यमावरील पूर्वीची २-३ ट्वीट प्रसारित झाली. त्यात हिंदु धर्म आणि भारताचा प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना लक्ष्य करण्यात आले होते. हे क्रिकेट जिहादचेच आणखी एक रूप होते. जी व्यक्ती हिंदुत्व आणि ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू यांना शिव्या देते, अशा व्यक्तीला भारतात पुष्कळ पैसे देऊन बोलावले जाते, हे अयोग्य होते. याप्रकरणी मी ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ आणि ‘देहली पोलीस सायबर सेल’ यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली. त्याच रात्री जैनाब दुबईला पसार झाली. हा माझा मोठा विजय होता आणि संपूर्ण पाकिस्तान माध्यमांमध्ये हे वृत्त प्रसारित झाले.
४. नमाजपठण करणार्या फलंदाजाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अन् भारतीय क्रिकेट मंडळाकडे तक्रार प्रविष्ट
‘खेळाचा कोणत्याही धर्माशी संबंध नसतो’, असे म्हटले जाते; पण पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने मैदानावरच नमाजपठण केले. वास्तविक हाही जिहादच आहे. या नमाजपठणाच्या विरोधात मी तक्रार प्रविष्ट केली. त्यावर पुष्कळ गदारोळ झाला. त्या वेळी ‘मैदानात नमाजपठण करण्यात कोणता जिहाद आहे ?’, असे हिंदूच म्हणत होते. माझ्याच अधिवक्ता मित्रांनी मला ‘ही तक्रार का करायची ?’, असा प्रश्न भ्रमणभाष करून विचारला, तसेच ‘मैदानात नमाजपठण करणे, ही त्याची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यात वाईट काय आहे ?’, असेही मला विचारले. इस्लामचा संपूर्ण अभ्यास करण्यात मला काही रूची नाही; पण असे म्हणतात, ‘नमाजपठण करतांना ते ठिकाण स्वच्छ असावे, ती भूमी पायाने तुडवलेली नसावी, तेथे कुणी पायात पादत्राण घालून गेलेले नसावे, अशी पवित्र जागा असावी.’ जेव्हा क्रिकेटच्या मैदानात नमाजपठण करण्यात आले, तेव्हा त्याने इस्लामच्या विरोधात काम केले होते; पण त्याला सर्व माफ केले; कारण हा क्रिकेट जिहाद आहे.
क्रिकेटचा सामना चालू असतांना मैदानात जाणीवपूर्वक नमाजपठण केले जाते, तेव्हा जगभरातील कोट्यवधी लोकांकडे सरळ संदेश पोचवला जातो. अशा प्रकारच्या कृती कधीही हिंदुत्वनिष्ठ क्रिकेटरने केल्या नाहीत. एखाद्या हिंदु क्रिकेटपटूने शतक झळकावले किंवा सामना जिंकला; म्हणून तेथेच ‘हनुमानचालिसा’ म्हणणे चालू केले, असे कधी झाले नाही. त्यामुळे वरील तक्रार घेऊन मी ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद’ आणि ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ यांच्याकडे मी सतत संपर्क केला.
५. क्रिकेटमधील धार्मिक उपद्रव थांबवण्यासाठी कायदा करणे आवश्यक !
किती इस्लामी देशांमध्ये क्रिकेट खेळले जाते, हाही एक प्रश्नच आहे; परंतु हे लोक मुसलमानेतर देशांमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून जिहाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मैदानात करण्यात येणार्या अशा कृतींविरुद्ध विशिष्ट कायदा करण्यात यावा, अशी माझी संबंधित लोकांकडे मागणी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जिहादला पायबंद बसेल.’
– अधिवक्ता विनीत जिंदाल, देहली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, देहली.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !