बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात गोहत्या बंदी कायदा मागे घ्यावा, अशी मागणी मुसलमान संघटनांनी सरकारकडे केली आहे. येथे मुसलमान महासंघाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्नाटक मुस्लिम संमेलना’मध्ये राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात समुदायाच्या नेत्यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘काँग्रेसने सत्तेवर येताच हा कायदा मागे घेण्याचे किंवा तो दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आतापर्यंत ते केलेले नाही; म्हणून हा जनविरोधी आणि अवैध कायदा तात्काळ रहित करावा’, अशी मागणी संमेलनाने सरकारकडे केली आहे.
“Remove the law banning cow slaughter in Karnataka!” – demand by 48 Muslim organisations to the Congress government.
It is surprising that the anti-Hindu Congress government in Karnataka has still not repealed this law!
If the Congress government, which often behaves like a… pic.twitter.com/sJzGoUjXqd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
‘यापूर्वीच्या भाजप सरकारने मुसलमानांना त्रास देण्याच्या उद्देशानेच गोहत्याबंदी कायदा लागू केला होता. या कायद्यामुळे बनावट गोरक्षकांना गुरांची वाहतूक करणार्यांवर आक्रमण करण्याची आणि त्यांना लुटण्याची सुवर्णसंधी मिळाल्यासारखे झाले आहे’, असा आरोप संमेलनात करण्यात आला.

संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !