‘फॅशन शो’ कि ‘लव्ह जिहाद’चे कारखाने ?

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. ‘फॅशन शो’च्या माध्यमातून शेकडो हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात

‘देशात धर्मांधांकडून ‘फॅशन शो’चे आयोजन केले जाते. याचे आयोजक आणि निरीक्षक हे धर्मांधच असतात. अर्थात् त्यात भाग घेणार्‍या सर्व मुली हिंदु असतात. ते व्यासपिठासमोर बसून मुलींचे निरीक्षण करतात. या कार्यक्रमांचे ध्वीचित्रीकरण केले जाते. त्याचा वापर अन्य चुकीच्या कामांसाठी केला जातो. त्यांचे अनेक सौंदर्यवर्धनालयांशीही (ब्युटीपार्लरशी) चांगले संबंध असतात. सौंदर्यप्रसाधने बनवणार्‍या बहुराष्ट्रीय आस्थापनाही अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. वर्ष २०२३ मध्ये जबलपूर येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) धाड घातली होती. त्यात अधिवक्ता उस्मानीला कह्यात घेतले होते. त्याच्याकडे लक्षावधीच्या संख्येत हिंदु मुलींची माहिती असलेल्या अनेक चित्रफीती सापडल्या. याप्रकरणाच्या खोलात गेल्यावर उस्मानी हा ‘फॅशन शो’ आणि अन्य ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) यांचे आयोजन करत होता अन् त्याच्या या कामात बहुतांश मुसलमान मुले काम करत हाती, असे लक्षात आले.

साध्वी आत्मनिष्ठा

अशा कार्यक्रमांतून ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे होतात. या ‘फॅशन शो’च्या वेळी ‘रॅम्प’वर चालतांना हिंदु मुलींच्या चित्रफिती काढल्या जातात. त्यानंतर त्या सर्व इस्लामी देशांत पाठवल्या जातात. त्यातून इस्लामी देशांतील श्रीमंत लोक मुलींची निवड करतात. आवडणारी मुलगी मिळवण्यासाठी ते सर्व साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करतात. ‘फॅशन शो’शी संबंधित लोक तिला मॉडेल बनवण्याचे किंवा चांगली नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवतात आणि कसेही करून तिला देशाबाहेर पाठवतात. तेथे तिला खरेदी करणारे तिचा उपभोग घेतात आणि त्यानंतर तिला वेश्यालयासाठी पाठवून देतात. वेश्यालयात जाण्यास विरोध करणार्‍या मुलींना ठार केले जाते. त्यानंतर तिच्या शरिराचे सर्व अवयव विकले जातात. अशा प्रकारे हिंदु मुलींचे आयुष्य संपते.

२. ‘फॅशन शो’च्या कार्यक्रमांना विरोध

अशा प्रकारचे ‘फॅशन शो’ प्रत्येक शहरात चालतात. अशा कार्यक्रमांतून त्यांना पुष्कळ पैसा मिळतो, तसेच अन्य देशांमधूनही त्यांना निधी मिळतो. आम्ही अशा कार्यक्रमांना विरोध करणे चालू केले. अशा कार्यक्रमांना विरोध केल्यावर आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात. काही वेळा पैशांचे प्रलोभन दाखवले जाते. असे असतांनाही आम्ही हे कार्य दृढतेने करत आहोत. या कार्यक्रमांना विरोध केल्यावर आमच्यावरच गुन्हे नोंदवले जातात. हे लोक अतिशय नियोजनपूर्वक काम करतात. आम्हाला एका मॉलमध्ये ‘शो’ चालू असल्याचे समजले, तेव्हा आम्ही तेथे धडक दिली. त्या वेळी मॉलच्या मालकाने ४ वेळा मॉलची विद्युतयंत्रणा बंद केली. त्या अंधारात त्याने धर्मांधांना पलायन करण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी लोक हळूच तळघरातील मार्गातून पळून गेले.

३. वलयांकित लोकांना निमंत्रित करून अधिकाधिक हिंदु मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न

या कार्यक्रमांमध्ये ते वलयांकित (सेलिब्रिटी) व्यक्तीला बोलावतात. एकदा त्यांनी अभिनेत्री मंदाकिनी यांना आमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाला आम्ही विरोध केला. मला भ्रमणभाषवरून धमक्याही देण्यात आल्या. विशेष म्हणजे शासकीय प्रमाणपत्रही त्यांच्याकडे असते. अशा प्रकारे सरकारच्या साहाय्याने असे कार्यक्रम केले जातात. ते सरकारकडून पैसे घेणार अन् तो कार्यक्रम पहायला येतील, त्यांच्याकडूनही पैसे घेणार. आम्ही त्या कार्यक्रमाच्या सभागृहात अभिनेत्री मंदाकिनी यांना जाऊ दिले नाही. हे आमचे यशच होते.

४. हिंदु महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न

आम्ही हिंदु महिलांसाठी हळदी कुंकवासारखे कार्यक्रम आयोजित केले. त्यात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह सबलीकरण करण्याच्या संदर्भातील शिबिराचा प्रचार केला. हिंदु महिलेच्या एका हातात जपमाळ आणि दुसर्‍या हातात शस्त्र असले पाहिजे. त्यासाठी नवरात्रीमध्ये आम्ही ‘शस्त्रपूजनाचा’कार्यक्रम घेतो. त्या प्रशिक्षणात स्वसंरक्षणाच्या संदर्भात संबंधित सर्व शिकवतो. अशा प्रकारे जबलपूरमध्ये विविध केंद्रे चालू आहेत.

हे ही वाचा →

‘फॅशन शो’ आणि सौंदर्यप्रसाधने यांद्वारे होणार्‍या हिंदु महिलांच्या फसवणुकीच्या विरोधात आवाज उठवला ! – साध्वी आत्मनिष्ठा, जबलपूर, मध्यप्रदेश

‘रॅम्प जिहाद’ : हिंदु महिलांसाठी षड्यंत्र !

५. ‘लव्ह जिहाद’ला स्वतःच्या स्तरावर विरोध करा !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा म्हटले होते, ‘माझ्या शरिरावर जेवढे घाव पडत आहेत, ते सर्व माझ्या शौर्याचे प्रतीक आहेत, हे माझ्यासाठी अलंकार आहेत ! हे घाव नसतील, तर माझी वीरता समजणार नाही.’ हिंदु मुलींना वाचवायला प्रशासन साहाय्य करणार नाही. त्यामुळे आपल्यालाच धर्मयोद्धे बनून बाहेर पडायचे आहे आणि दृढतेने कार्य करायचे आहे. अशा प्रकारे आपल्या भागातही धर्मांधांचे असे ‘फॅशन शो’चे कार्यक्रम होत असतील, तर त्याला प्रत्येकाने वैध मार्गाने विरोध करायला हवा. फार तर तुमच्यावर पोलिसांकडून गुन्हा नोंदवले जातील किंवा मारहाणही होईल; जोपर्यंत तुम्ही वैध मार्गाने विरोध करणार नाही, तोपर्यंत असे ‘फॅशन शो’सारखे कार्यक्रम होतच रहातील. अशा कार्यक्रमांना वैध मार्गाने विरोध होणे आवश्यक आहे.’

– साध्वी आत्मनिष्ठा, ‘चंडी वाहिनी’, जबलपूर, मध्यप्रदेश.