Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्‍या मुलाला अटक

धनबाद (झारखंड) – ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’चे कर्मचारी असलेल्या वडिलांची हत्या करून त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. मुलाने वडिलांच्या हत्येसाठी २ जणांना सुपारी दिली होती. त्यांनाही पोलिसांनी अटक केली.

धनबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस्. महंमद याकूब यांनी सांगितले की, मृत तुलेश्वर नोनिया यांचा मुलगा विजय चौहान याच्यासह अमित सिंह आणि अखिलेश मल्लाह या दोन भाडोत्री मारेकर्‍यांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नोनिया हे बारोरा येथील कोळसा खाणीत कामगार होते. त्यांच्या सेवेची केवळ २ वर्षे शिल्लक होती. त्यांचा मुलगा विजय चौहान याला वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर खाणीत कायमस्वरूपी नोकरी मिळवायची होती आणि याचसाठी त्याने वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला. चौहानने वडिलांच्या हत्येसाठी साथीदारांना १० लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता; मात्र हत्येपूर्वी कोणतीही आगाऊ रक्कम देण्यात आली नव्हती.