‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्यासारख्या थोर विभूतीच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे चैतन्यमय असे ज्ञानभांडार ! हे ग्रंथ लोखंडाचे सोने करणार्या परिसाप्रमाणे आहेत; कारण या ग्रंथांतील शिकवण आचरणात आणल्याने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र पालट होत आहेत !
अनेक संत धर्म, अध्यात्म यांसंबंधी ग्रंथ लिहितात; पण धर्म, अध्यात्म यांच्यासह राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण, हिंदु राष्ट्राची स्थापना, भाषाशुद्धी, सात्त्विक कला अशा विविधांगी विषयांवर ग्रंथ लिहिणारे सध्याच्या कलियुगातील गुरुदेव बहुधा एकमेवच संत असतील ! गुरुदेवांच्या अविश्रांत तळमळीमुळे एप्रिल २०२६ पर्यंत सनातनच्या ३७० ग्रंथ-लघुग्रंथांच्या विविध भाषांत १ कोटी २ लाख ६७ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत !
सनातनच्या ग्रंथांनी १ कोटीचा टप्पा पार करणे, ही सनातनच्या ग्रंथकार्यासाठी भूषणावह घटना आहे ! प्रकाशित प्रतींच्या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.
ग्रंथलिखाणाच्या माध्यमातून अखिल मानवजातीचा उद्धार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘काळाच्या ओघात हिंदु धर्माची महती अल्प होऊ लागली. धर्मशास्त्र समजून घेऊन कृती न केल्याने त्यातून अपेक्षित लाभ न झाल्यामुळे मनुष्य धार्मिक कृतींपासून दूर जाऊ लागला. ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हेच मनुष्यजन्माचे मूळ उद्दिष्ट आहे आणि मानवाला त्याचाच विसर पडला आहे. त्यामुळे ‘धर्मातील ज्ञान आणि ईश्वरप्राप्तीचे मार्ग अखिल मानवजातीला कळावेत’, या उद्देशाने मी ग्रंथलिखाण करत आहे. या ग्रंथांद्वारे आनंदप्राप्ती आणि शीघ्र गतीने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी काळानुसार आवश्यक अशा साधनेची शिकवण दिली जात आहे.
मी इतर संतांप्रमाणे सर्वत्र फिरून कीर्तने आणि प्रवचने केली असती, तर समाजात केवळ माझे नाव झाले असते. तसे न करता मी तो वेळ अध्यात्मशास्त्रावरील, तसेच इतर विषयांवरील ग्रंथांचे लिखाण करण्यासाठी दिला. सहस्रो जिज्ञासूंनी अध्यात्मशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास केला आणि ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे जाणून त्वरित साधनेलाही आरंभ केला. त्यामुळे जिज्ञासू साधक बनले आणि पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना करून ते संतपदाकडे वाटचाल करू लागले. १३ मे २०२६ पर्यंत १३४ साधक संत झाले आहेत, तर १,०२६ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. एवढ्या जलद गतीने साधक आणि संत यांची निर्मिती होण्याचे हे पहिलेच उदाहरण असेल ! समाजाला आध्यात्मिक स्तरावर झालेला हा लाभ माझ्या प्रसिद्धीच्या तुलनेत कैक पटींनी अधिक महत्त्वाचा आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.५.२०२६)
१. सनातनच्या चैतन्यमय ग्रंथसंपदेची काही अद्वितीय वैशिष्ट्ये

अ. आध्यात्मिक विषयांवरील सनातनच्या विविध ग्रंथांतील सुमारे ३० टक्के लिखाण हे अन्य संदर्भग्रंथांतील लिखाण आहे, सुमारे २० टक्के लिखाण हे साधकांना सूक्ष्मातून मिळालेले ईश्वरी ज्ञान आहे, तर ५० टक्के लिखाण गुरुदेवांना त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे !
आ. अध्यात्मातील कृतींविषयी ‘का अन् कसे ?’ यांची शास्त्रीय उत्तरे !
इ. विज्ञानयुगातील वाचकांना सहज समजेल अशा आधुनिक वैज्ञानिक भाषेतील (उदा. टक्केवारी सांगणे) ज्ञान !
ई. अध्यात्मातील विविध गोष्टींच्या संदर्भात वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधन, सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी चित्रे आणि लिखाण !
उ. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी साधनेविषयीचे तात्त्विक विवेचनच नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन !
ऊ. सनातनच्या बहुतांश ग्रंथांमध्ये अन्य संदर्भग्रंथांतील सारही घेतलेले असते. त्यामुळे अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासकाला आवश्यक असणारे सर्व ज्ञान त्या त्या विषयावरील एकाच ग्रंथात मिळून त्याचा अनेक ग्रंथ वाचण्यातील वेळ वाचतो !
२. सनातनच्या ग्रंथसंपदेचा भाषानिहाय विस्तार

सनातनच्या ग्रंथांतील चैतन्यमय ज्ञान केवळ एका भाषेपुरते मर्यादित न रहाता विविध प्रांतांतील जिज्ञासूंपर्यंत पोचावे, यासाठी सनातनने एप्रिल २०२६ पर्यंत १३ भाषांमध्ये तिचे ज्ञानभांडार खुले केले आहे. यामध्ये सर्वाधिक ३४८ ग्रंथ मराठी भाषेत असून त्यापाठोपाठ इंग्रजी भाषेत २०२, तर कन्नड आणि हिंदी या भाषांत प्रत्येकी २०१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यासमवेतच गुजराती भाषेत ७०, तेलुगुमध्ये ५४, तमिळमध्ये ४९, बंगालीमध्ये ३०, मल्ल्याळम्मध्ये २५, ओडियामध्ये २२, पंजाबीमध्ये १३, नेपाळीमध्ये ३ आणि आसामी भाषेत २ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अशा प्रकारे ग्रंथांच्या माध्यमातून अध्यात्माचा चैतन्यमय प्रवाह भारतभर प्रवाहित होत आहे.
आबालवृद्धांसाठी उपयुक्त असलेल्या सनातनच्या वैविध्यपूर्ण ग्रंथमालिका
- हिंदु धर्मातील आचार (२८ ग्रंथ)
- धार्मिक कृती (१३ ग्रंथ)
- देवतांची उपासना (४० ग्रंथ)
- नामजप-साधना (४ ग्रंथ)
- साधना आणि भावजागृती (६६ ग्रंथ)
- गुरुकृपायोग (४ ग्रंथ)
- गुरु आणि शिष्य (५ ग्रंथ)
- कर्मयोग (६ ग्रंथ)
- सात्त्विक कला (५ ग्रंथ)
- भाषा (१० ग्रंथ)
- राष्ट्र आणि धर्म रक्षण (१९ ग्रंथ)
- हिंदु राष्ट्राची स्थापना (७ ग्रंथ)
- हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ (११ ग्रंथ)
- संतांची चरित्रे आणि शिकवण (५८ ग्रंथ)
- बालसंस्कार (८ ग्रंथ)
- मुलांचे संगोपन (१६ ग्रंथ)
- आयुर्वेद (३३ ग्रंथ)
- स्वभावदोष-अहं यांचे निर्मूलन (११ ग्रंथ)
- भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठीची सिद्धता आणि उपाय (२६ ग्रंथ)
३. आणखी ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत !
‘समष्टीला अध्यात्मातील छोट्या छोट्या गोष्टींमागील शास्त्र समजावे’, यासाठी गुरुदेव अहोरात्र धडपडत असतात. गुरुदेवांना आता वयोमानानुसार थकवा असतो. त्यांना थकव्यामुळे पलंगावर आडवे पडावे लागले, तरी त्यांच्या हातात कुठले ना कुठले तरी पुस्तक असते. त्या पुस्तकावर गुरुदेव खुणा करून ते लिखाण संगणकात संग्रहित करण्यासाठी देतात. त्यांच्या या अविरत चालू असलेल्या ज्ञानसंग्रहामुळे अजून ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवण्यात आले आहे.
गुरुदेवांच्या कृपेने आणि संकल्पाने सनातनचे ग्रंथकार्य असेच उत्तरोत्तर वाढत राहील, यात शंका नाही !’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (८.५.२०२६)
ग्रंथ मिळवण्यासाठी संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष