ठाणे – कसारा परिसरात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी १८ गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पकडला. १३ मे च्या रात्री कसारा पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोवंशियांना कोंबून नेले जात असल्यामुळे ३ गोवंशियांचा मृत्यू झाला, तर १५ गोवंशियांची सुटका करण्यात आली. सुटका केलेले गोवंश जवळच्या मान्यताप्राप्त गोशाळेत हालवण्यात आले असून पुढील अन्वेषण कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
पोलिसांनी एका आरोपीला कह्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, तर त्याचे साथीदार पसार झाले आहेत. (महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असून गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही अशा प्रकारे सर्रास तस्करी होत असेल, तर यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक)
आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे शहापूर तालुका अध्यक्ष मुकेश बांगर, आणि उपाध्यक्ष जीतू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सचिन रडगे, विक्रम विदे, स्थानिक ग्रामस्थ आणि गोसेवक विलास धानके, वैभव धानके, शिवाजी भोईर, सुरेश भल्ला यांनी गोवंशियांना पकडून दिले. (स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षणासाठी कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक)

पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !