अधर्माचा पुरस्कार करणार्या शाम मानवांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना आव्हान दिल्याचे प्रकरण

नागपूर – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या चमत्कारांना आव्हान देत ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने पारितोषिकाची रक्कम ३० लाख रुपयांवरून ८० लाख रुपये केली आहे. समितीचे संयोजक शाम मानव यांनी हे आव्हान दिले असून त्याला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘ज्याला परीक्षा घ्यायची असेल, त्याने दरबारात यावे’, असे प्रत्युत्तर दिले. शाम मानव यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आव्हानाच्या अटींची माहिती दिली.
Whoever wishes to test me should come to the Darbar: Pandit Dhirendra Krishna Shastri
Matter regarding Shyam Manav, who promotes irreligion, challenging Pandit Dhirendra Krishna Shastri
Raising questions over the work of Hindu Saints and attempting to defame them is nothing but… pic.twitter.com/7BD4PeKfdU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2026
शाम मानव यांनी दिलेल्या आव्हानाच्या अटी !
१. ही चाचणी केवळ नागपूरच्या पत्रकार भवनामध्येच होऊ शकेल.
२. एक पंच समिती स्थापन केली जाईल. याला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची संमतीही असेल. चाचणीच्या वेळी ते आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांचे भ्रमणभाष सीलबंद केले जातील.
३. महाराजांसमोर अचानक १० अनोळखी व्यक्ती आणल्या जातील. महाराजांना त्या व्यक्तींचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, आडनाव आणि भ्रमणभाष क्रमांक सांगावा लागेल, तसेच जवळ ठेवलेल्या १० वस्तूंची ओळख त्यांच्या ‘दिव्य दृष्टी’ने करून द्यावी लागेल.
४. जर ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले, तर ५ दिवसांनंतर नवीन लोकांसमवेत हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल. दोन्ही वेळा ९० टक्के अचूक निकाल आल्यास त्यांना ८० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तर्क आहे की, दरबारात माहिती गोळा करण्याचे गुप्त मार्ग असू शकतात. त्यांना नियंत्रित करणे कठीण आहे. जर महाराजांनी स्वतःला सिद्ध केले, तर मी त्यांच्या चरणांवर माथा टेकीन, माझी संस्था बंद करीन आणि त्यांचा भक्त होईन. महाराज आव्हान स्वीकारणार नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, निष्पक्ष आव्हानात सहभागी झाल्यास धंदा बंद होईल. यामुळे ते पळून गेले. त्यांचे कार्य ढोंगी आहे.
आम्ही जादूगार नाही, ही ईश्वरी प्रेरणा ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रीया आव्हानाला उत्तर देतांना पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले, ‘‘आम्ही जादूगार नाही. आम्हाला ईश्वर जी प्रेरणा देईल, त्यानुसार आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो.’’ |
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
रत्नागिरीत अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात योग महोत्सव साजरा
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !