‘२७.६.२०२६ या दिवशी मूळ रेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले चि. संदीप गवंडी आणि चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. संदीप गवंडी आणि चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. संदीप गवंडी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. कु. श्रुती पोवार, बोरीवली, मुंबई
अ. ‘संदीपदादा महत्त्वाची सेवा करत असतांना त्याच्याकडे अन्य सेवा आल्यासही त्याच्या चेहर्यावर कधीही ताण दिसत नाही. तो हसतमुखाने आणि आनंदाने सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
आ. तो प्रत्येक सेवा उत्साहाने करतो.
इ. तो आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्याकडून सेवा करून घेतो. आमची सेवा पूर्ण झाल्यावर तो आमचे कौतुक करतो.’
२. श्री. हेमंत पुजारे, विरार (जिल्हा पालघर)
२ अ. धर्मप्रेमींशी जवळीक साधणे : ‘संदीपदादा संपर्कासाठी गेल्यावर नवीन व्यक्तीशी सहजतेने जवळीक साधतात. ते धर्मप्रेमींशी संवाद साधतांना त्यांचे कार्यक्षेत्र, त्यांच्यातील कलागुण यांविषयी, तसेच त्यांच्याविषयी इतर माहिती जाणून घेतात. त्यामुळे समोरील व्यक्तीला संदीपदादा आपले वाटतात.’
३. श्री. रोहन रविंद्र पातेने, गोरेगाव, मुंबई.
३ अ. ‘संदीपदादाची सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५७ वर्षे) यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. दादाच्या सत्संगामुळे ‘सेवेत गुरूंप्रती भाव कसा ठेवायचा ?’, हे मला शिकता आले आणि माझ्यात गुरूंप्रती श्रद्धा निर्माण झाली.
‘दादाच्या रूपाने मला साधनेत मित्र आणि मोठा भाऊ लाभला’, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो अन् त्याच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देतो.’
४. सौ. नेहा सिंह, अंधेरी, मुंबई.
अ. ‘संदीपदादांना आरंभी सामाजिक माध्यमाच्या (सोशल मिडियाच्या) संदर्भातील सेवेविषयी फारशी माहिती नव्हती. ते साधकांकडून त्याविषयी जाणून घेत असत. ‘गुरुदेवांच्या कृपेनेच स्वतःत शिकण्याची जिद्द, सेवा करण्याची तळमळ आणि विनम्र भाव आहे’, असा दादांचा भाव आहे.
आ. दादा साधकांशी संवाद साधून आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यांना तत्परतेने मार्गदर्शन करतात.’
५. श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र, ठाणे.
५ अ. लेखनकौशल्य : ‘संदीपला विविध भाषांचे उत्तम ज्ञान आहे. तो जाहिरात क्षेत्रात कार्यरत असून विविध भाषांतील जाहिरातींचे भाषांतर करण्याचे काम करतो. या क्षेत्रात काम करत असतांनाच त्याने १२ भाषांमध्ये वाचन आणि लेखन याचे कौशल्य आत्मसात केले आहे.
५ आ. सेवेची तळमळ
१. संदीप नोकरी सांभाळून रात्री उशिरापर्यंत सेवा करतो. त्याचे कार्यालय मुंबई येथील जोगेश्वरी येथे असून तो भांडुप येथे रहातो. त्याला कार्यालयातून निघायला उशीर झाल्यासही तो दादर किंवा घाटकोपर येथे सेवेसाठी येतो.
२. संदीपने सामाजिक प्रसिद्धी माध्यमाच्या (सोशल मिडियाच्या) सेवेचे दायित्व कुशलतेने सांभाळले. त्याला या क्षेत्रातील अनुभव नसतांनाही त्याने सेवेची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी चांगले प्रयत्न केले.’
उखाणेवधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
|
चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. कु. विशाखा धनावडे, घाटकोपर, मुंबई.
अ. ‘भाग्यश्रीताई प्रत्येक साधकाशी नम्रतेने बोलते.
आ. ती प्रत्येक सेवा आनंदाने स्वीकारते. ती प्रत्येक सेवा हसतमुख राहून करते.
इ. ‘प्रत्येक सेवेत देवाशी अनुसंधान कसे साधायचे ?’, हे तिच्याकडून मला शिकता येते. तिचे देवाशी अनुसंधान असल्याने ती नेहमी हसतमुख आणि ताणविरहित असते.
ई. ‘अडचणींच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न करून देवाला कसे आळवायचे ?’, याविषयी ती सहजतेने सांगते.’
२. कु. श्रेया नलावडे, वाशी, नवी मुंबई.
२ अ. जिज्ञासू वृत्ती : ‘ताई प्रत्येक सेवा नाविन्यपूर्ण पद्धतीने करते. ताई सेवा करत असतांना आम्हाला तिच्याकडून बरेच काही शिकायला मिळते. तिला सेवा करत असतांना नवीन सूत्र शिकायला मिळाल्यास ती साधकांना जिज्ञासू वृत्तीने विचारून घेते.
२ आ. सेवेची तळमळ : पूर्वी ताई तिचे व्यावसायिक क्षेत्र आणि वैयक्तिक गोष्टी सांभाळून तळमळीने सेवा करत होती. तेव्हा तिला ‘ती सेवा करण्यात किती अल्प पडते ?’, असे वाटत असे. ताई सेवा करायला नेहमी तत्पर असते.
२ इ. इतरांना साहाय्य करणे : ताई साधकांना नेहमी साहाय्य करते. साधकांना तिचा आधार वाटतो. ती घरातील दायित्व, नोकरी आणि सेवा सांभाळून इतरांना ‘काय हवे-नको’ हे पहाते.’
३. सौ. नेहा सिंह, अंधेरी, मुंबई.
अ. ‘ताई पूर्वी एका आस्थापनात नोकरी करत होत्या. त्यांची सेवेचे नियोजन करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. त्यांना एखादी ‘पोस्ट’ (सोशल मिडियावर एखादी माहिती किंवा फोटो अपलोड करणे) ‘एक घंट्यानंतर पाठवा (शेअर करा)’, असे सांगितल्यास त्या ‘पोस्ट’ वेळेत पाठवतात.’
४. कु. श्रुती पोवार, बोरीवली. मुंबई
४ अ. प्रेमभाव : ‘मी आणि भाग्यश्रीताई देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी प्रत्येक शनिवारी जात होतो. तेव्हा मला रेल्वेने प्रवास करणे शक्य होत नव्हते. तेव्हा भाग्यश्रीताईने मला प्रवासाची वाटणारी भीती न्यून करण्यास साहाय्य केले. ती माझा हात धरून मला रेल्वेच्या डब्यात चढण्यासाठी साहाय्य करत असे. तेव्हा मला तिच्या ठिकाणी सूक्ष्मातून गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन होत असे.’
५. श्री. बळवंत पाठक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र, ठाणे
५ अ. साधनेला प्राधान्य देणे : ‘भाग्यश्री ही उच्चशिक्षित असून एका चांगल्या आस्थापनात कार्यरत होती. १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्त ‘सेवेला अधिकाधिक वेळ देता यावा’, यासाठी तिने नोकरीचे त्यागपत्र दिले. विशेष म्हणजे, त्या वेळी तिचा विवाह निश्चित झालेला असतांनाही तिने हा धाडसी निर्णय घेतला.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २३.६.२०२६)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !