‘२७ जून २०२६ या दिवशी कुडाळ येथील सनातनची साधिका चि.सौ.कां. गुलाबी धुरी आणि पुणे येथील सनातनचे साधक चि. कौशिक पाटील यांचा शुभविवाह खेड, पुणे येथे होत आहे. चि.सौ.कां. गुलाबी धुरी काही काळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत होत्या. त्या वेळी साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. कौशिक पाटील आणि चि.सौ.कां. गुलाबी धुरी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. हसतमुख आणि आनंदी
‘गुलाबी नेहमी हसतमुख असते. तिच्या चेहर्यावर कधीही थकवा किंवा ताण जाणवत नाही. ती प्रत्येक प्रसंगाकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाते. तिची प्रत्येक चांगल्या-वाईट घटनेतून काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती आहे. ती नेहमी शिकण्याच्या स्थितीत असल्यामुळे ती सतत आनंदी असते.
२. सगळ्यांशी सहजतेने जवळीक साधणे
ती सगळ्यांशी मिळून-मिसळून रहाते. ती प्रत्येक वयोगटातील व्यक्तीशी सहजतेने संवाद साधते आणि त्यांची मने जिंकून घेते.
३. सेवेची तळमळ
ती नेहमी तत्परतेने सेवा करत होती. ती अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत सेवा करूनही दुसर्या दिवशी सकाळी उत्साही असे. तिच्यात सेवा करण्याची तळमळ असल्याने तिला कधी थकवा जाणवत नसे.

४. रुग्णाईत साधिकांची सेवा भावपूर्ण करणे
ती आश्रमातील रुग्णाईत साधकांची सेवा ‘गुरुदेवांचीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सेवा करत आहे’, या भावाने करत असे. ती करत असलेल्या सेवेमुळे रुग्णाईत साधकांनाही पुष्कळ मानसिक आणि आध्यात्मिक आधार मिळत होता.
५. गुरुदेव आणि संत यांच्याप्रती उत्कट भाव
गुलाबीच्या अंतःकरणात गुरुदेव आणि संत यांच्याप्रती उत्कट भाव आहे. कोणतीही सेवा असो, ती सेवा गुलाबी अत्यंत भावपूर्ण रितीने करत असे. तिची गुरूंप्रतीची श्रद्धा तिच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती.
‘चि.सौ.कां. गुलाबीचे वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी, सुखी आणि अध्यात्ममय होवो’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सुश्री स्मिता ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२६)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !