‘जैश-ए-महंमद’च्या आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये पोलिसांनी मश्कूर अहमद उपाख्य मश्कूर मास्टर नावाच्या सरकारी शिक्षकाला नुकतीच अटक केली. मश्कूर अहमदने ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना आश्रय देण्यासह त्यांना इतर सुविधा पुरवल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ‘जैश-ए-महंमद’चा कमांडर सैफुल्ला बलूची याचे एक छायाचित्र आरोपीच्या घराच्या आत काढण्यात आले होते, असे अन्वेषणात समोर आले आहे. या छायाचित्रामध्ये आतंकवाद्याच्या गळ्यात नोटांचा हार दिसत आहे.
२२ फेब्रुवारी या दिवशी चतरू येथे राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन त्राशी-२’च्या वेळी सैफुल्ला बलूची त्याच्या २ पाकिस्तानी साथीदारांसह मारला गेला होता. यानंतर त्याच्याविषयी केलेल्या अन्वेषणात त्याचे धागेदोरे मश्कूर अहमदशी जुळल्याचे उघड झाले. त्यानंतर चौकशीअंती मश्कूर अहमद याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय