
तेहरान (इराण) – अमेरिकेकडे सद्भावनेचा अभाव आहे. तसेच अमेरिकेचा अप्रामाणिकपणा हाच या युद्धाच्या समाप्तीसाठी सर्वांत मोठा अडथळा ठरत आहे, असे विधान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर टीका करतांना केले. नॉर्वेच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांसमवेत झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, इराणविरुद्धची सैनिकी कारवाई आणि इराणी बंदरांवरील सततच्या नाकेबंदीमुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीला (२ मोठ्या जलाशयांना जोडणार्या जलमार्गाला) लागून असलेला एक किनारी देश म्हणून इराण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या जलमार्गाशी संबंधित नवीन नियमांवर विचारविनिमय करत आहे.
डॉनल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हे चीनच्या दौर्यावर आहेत. चीनला मार्गस्थ होण्यापूर्वी डॉनल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणचे सैन्य मोठ्या प्रमाणात दुर्बल झाले आहे. या संघर्षात अमेरिकेचाच विजय होईल. आपण हे युद्ध कसेही करून जिंकू. शांततेने किंवा इतर मार्गांनी का होईना; पण आपण युद्ध जिंकू. त्यांचे (इराणचे) नौदल आणि वायूदल नष्ट झाले आहे, त्यांच्या युद्ध यंत्रणेचा प्रत्येक घटक गेला आहे.
अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करत नाही ! – ट्रम्प
या वेळी पत्रकाराने प्रश्न विचारला की, अमेरिकेच्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती तुम्हाला करार करण्यासाठी कितपत भाग पाडत आहे ? यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले की, अगदी किंचित्ही नाही. मी अमेरिकेच्या नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करत नाही. मी कुणाचाही विचार करत नाही. मी केवळ एकाच गोष्टीचा विचार करतो. आपण इराणला अण्वस्त्रे मिळवून देऊ शकत नाही. बस्स एवढेच.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक