‘रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला प्रतिदिन अनेक जिज्ञासू भेट देतात. त्या वेळी ‘आश्रमात रहाणारे शेकडो साधक घरादाराचा त्याग करून पूर्णवेळ धर्मकार्य करत आहेत’, हे पाहिल्यावर अनेक जणांना काही सामायिक प्रश्न पडतात. ‘तुमचे पुढे कसे होणार ?’
‘तुम्ही तुमच्या आई-वडिलांची काळजी कशी घेणार ?’ इत्यादी. जिज्ञासूंना पडणारे प्रश्न ‘आजच्या काळाला अनुसरून अयोग्य आहेत’, असे म्हणता येणार नाही. याचे कारण सध्या बहुतांश जणांना ‘पैसा म्हणजेच सर्वस्व’ आणि ‘पैसा असेल, तरच जीवन सुखकर होते’, असे वाटत असते. ‘मुलांनी तरुणपणी नोकरी किंवा व्यवसाय करावा, भरपूर पैसा कमवावा आणि आई-वडिलांची काळजी घ्यावी’, अशी त्यांची माफक अपेक्षा असते.
व्यावहारिक दृष्टीने हे योग्य असले, तरी आध्यात्मिक दृष्टीने याकडे निराळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. ज्या देवाने आपल्या सर्वांना जन्माला घातले, तोच खर्या अर्थाने आपला पालनकर्ता आहे. आपला प्रत्येक श्वास त्याच्याच कृपेने चालू आहे. असे असतांना ‘मी भरपूर पैसा कमवीन आणि स्वतःची अन् आई-वडिलांची काळजी घेईन’, असे लौकिक अर्थाने म्हणणे किंवा समजणे, हे आध्यात्मिक दृष्टीने अयोग्य आहे. साधना केल्यावरच हे खर्या अर्थाने उमजते. येथे माझा उद्देश ‘मुलांनी नोकरी-व्यवसाय करू नये किंवा आई-वडिलांना वार्यावर सोडून द्यावे’, असे सांगण्याचा निश्चितच नाही. आपण आध्यात्मिक मार्गाने वाटचाल करू लागलो, म्हणजे साधना करू लागलो की, आपली सर्व काळजी देवच गुरूंच्या किंवा अन्य कुणा व्यक्तीच्या माध्यमातून घेत आहे आणि देवाने आपल्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या पटींनी काळजी घेतलेली आहे, हे आपल्या लक्षात येते.
याविषयीची अनुभूती अनेक साधकांनी वेळोवेळी घेतली असल्याने ते निश्चिंतपणे आश्रमात राहून पूर्णवेळ राष्ट्र आणि धर्म यांविषयीची सेवा करतात. ‘देव कशी काळजी घेतो’, याची मी स्वतः, तसेच अन्य साधकांनी अनुभवलेले प्रसंग या लेखमालिकेत देत आहे. यातून ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !’ हे संतवचन किती सार्थ आहे’, हे लक्षात येईल. या लेखात दिलेल्या अनुभूती सर्वांनाच येतील, असे नाही; कारण देव प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार योग्य ते साहाय्य करत असतो आणि त्यातच त्या जिवाचे परमकल्याण सामावलेले असते. खालील प्रसंग वाचून आपण साधना करू लागलो, तर ‘देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कृपा करून आपले कल्याण करील’, याची मला निश्चिती आहे.
संकलक : श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम
गुरुदेवांची स्थूल रूपातील प्रीती दर्शवणारी छायाचित्रे !
‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !’

हे संतवचन सार्थ ठरवणार्या या लेखातील सर्व अनुभूतींमध्ये प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व कुठेही नाही, तर त्यांचे तत्त्व अर्थात् गुरुतत्त्व कार्यरत आहे. साधक हेच त्यांचे सर्वस्व आहे. साधकांवरील प्रीतीमुळेच गुरुतत्त्वाच्या माध्यमातून जशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांची काळजी घेतात, तशीच ते प्रत्यक्ष स्थुलातूनही घेतात. या लेखासमवेत दिलेल्या विविध छायाचित्रांच्या माध्यमातून आपण गुरुदेवांची साधकांवरील प्रीती अनुभवूया !

साधक आणि त्याचे कुटुंबीय यांना आलेली ईश्वरी शक्तीची प्रचीती !
प्रसंग १ : शेजार्यांकडून साहाय्य करून दिलेली कृपेची प्रचीती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना श्रद्धेने आत्मनिवेदन केल्यावर वडिलांच्या रक्ताचे योग्य अहवाल मिळणे
१ अ. वडिलांच्या रक्तातील साखर अकस्मात् वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागणे आणि परिचिताने ही गोष्ट कळवतांना ‘आई-वडिलांची काळजी घेत नाही’, असे म्हणून साधकावर ओरडणे : वर्ष १९९९ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी ठाणे येथील सेवाकेंद्रात रहाण्यास गेलो. माझ्या वडिलांना मधुमेह असल्याने मी गेल्यानंतर २-३ मासांनी त्यांची रक्तातील साखर अकस्मात् वाढली. त्यामुळे अकोला येथे आमच्या शेजारी रहाणार्या एका परिचिताने त्यांना रुग्णालयात भरती केले. नंतर त्यांनी दूरभाष करून मला कळवले आणि ते माझ्यावर पुष्कळ ओरडले. ते म्हणाले की, ‘तुम्ही आई-वडिलांची काळजी घेत नाही आणि सनातनच्या मागे फिरत रहाता !’ मी त्यांना शांतपणे म्हटले, ‘‘मी नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतो, तर तेव्हाही अशी परिस्थिती उद्भवली असती ना ! प्रत्येक जिवाची काळजी घेणारा देवच आहे. या वेळी त्याने तुमच्या माध्यमातून वडिलांना साहाय्य केले. मी तरी अधिक काय करू शकलो असतो ?’’ हे ऐकून त्या परिचितांनी रागाने दूरभाष ठेवून दिला.

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आत्मनिवेदन केल्यावर परिचिताचा दूरभाष येऊन त्यांनी ‘वडिलांना आता उपचारांची आवश्यकता नसल्याने रुग्णालयातून घरी पाठवले आहे’, असे सांगणे : त्यानंतर मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आत्मनिवेदन केले आणि वडिलांच्या आरोग्याविषयी त्यांना मानसरूपात सांगितले. नंतर दुसर्या दिवशी त्या परिचिताचा पुन्हा दूरभाष आला. त्यांनी सांगितले, ‘‘रुग्णालयातील वरिष्ठ आधुनिक वैद्यांनी वडिलांची तपासणी केली आणि पुन्हा रक्ताची तपासणी करायला सांगितली. तेव्हा ‘पहिले अहवाल चुकीचे होते’, असे आढळून आले. वडिलांना आता कोणत्याही विशेष उपचारांची आवश्यकता नसल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले आहे.’’ हे सांगत असतांना त्यांचा आवाज नम्र होता; कारण त्यांनाही गुरुदेवांच्या कृपेची प्रचीती आली होती. विशेष म्हणजे तोपर्यंत कधीच माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी प्रत्यक्ष गाठभेट झालेली नव्हती.
१ इ. ‘वडिलांची काळजी घेत नाही’, असे म्हणून ओरडणार्या परिचितांच्या निधनसमयी त्यांची मुले येऊ न शकणे : येथे मला आवर्जून लिहावेसे वाटते की, ‘वडिलांची काळजी घेत नाही’, असे म्हणून माझ्यावर ओरडणार्या त्या परिचिताचे निधन झाले. तेव्हा त्यांची मुले नोकरी आणि व्यवसाय यांमुळे अन्यत्र रहात असल्याने त्यांच्या समवेत नव्हती. त्यांचे सर्व काही शेजारी रहाणार्या लोकांनाच करावे लागले. आमच्या वडिलांच्या शेवटच्या क्षणी मात्र आम्ही भावंडे त्यांच्याजवळ होतो आणि त्यांची सेवाही करू शकलो.
– श्री. योगेश जलतारे
प्रसंग २ : सूक्ष्मातून स्थुलातील वाटाड्या !
कुलदेवतेच्या दर्शनाच्या ठिकाणी आई-वडिलांची ताटातूट झाल्यावर आईला परात्पर गुरु डॉक्टरांनीच वडिलांपाशी आणून सोडणे
एकदा माझे आई-वडील (सनातनचे साधक कै. वामनराव जलतारे आणि सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे, वय ८६ वर्षे) कुलदेवतेच्या दर्शनासाठी माहूर (जि. नांदेड) येथे श्री रेणुकादेवीच्या शक्तिपिठाच्या ठिकाणी गेले होते. त्या गडावर दोन डोंगर आहेत. एका डोंगरावर श्री रेणुकादेवीचे मंदिर आहे, तर दुसर्या डोंगरावर श्री कालिकामातेचे मंदिर आहे. कालिकामातेच्या मंदिरात अधिकतः तंत्र उपासना करणारे लोक जातात. माहूर येथे भाविकांची पुष्कळ गर्दी असल्याने आई-वडिलांची ताटातूट झाली आणि आई अनावधानाने कालिकामातेच्या मंदिराकडे जाऊ लागली. तेव्हा पांढराशुभ्र सदरा घातलेले एक गृहस्थ तिला भेटले. त्यांनी आईला वाट चुकल्याची जाणीव करून दिली आणि हाताला धरून वडिलांजवळ आणून सोडले. काही मासांनी जेव्हा आईने प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र पाहिले, तेव्हा तिला लक्षात आले की, ‘तिचा हात धरून तिला वडिलांकडे नेऊन सोडणारे प.पू. डॉक्टरच होते !’ – श्री. योगेश जलतारे

प्रसंग ३ : सूक्ष्मातून स्थुलात सावरणारा !
धावत्या रेल्वेत चढतांना वडिलांचा तोल गेल्यावर त्यांना ज्या व्यक्तीने सावरले, ते परात्पर गुरु डॉक्टरच असणे !
एकदा वडील रेल्वेने परगावी चालले होते. तेव्हा रेल्वेस्थानकावर पुष्कळ गर्दी होती. त्यामुळे त्यांना रेल्वेच्या डब्यात चढायला वेळ लागला. नंतर रेल्वे धावू लागल्यावर डब्यात चढत असतांना वडिलांचा तोल गेला आणि ते खाली पडणार, तेवढ्यात एका व्यक्तीने त्यांचा हात धरला आणि त्यांना सावरले. तोपर्यंत वडिलांनी प.पू. डॉक्टरांना पाहिले नव्हते. नंतर त्यांनी सनातन-निर्मित ‘साधना’ या विषयावरील प्रवचनाच्या ध्वनीफितीवर असलेले प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र पाहिले. ते पाहून वडिलांनी मला सांगितले, ‘‘रेल्वेत चढत असतांना माझा तोल गेल्यावर माझा हात धरणारी व्यक्ती हीच होती !’’
– श्री. योगेश जलतारे

प्रसंग ४ : साधकांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या साहाय्य !
प्रवासात ‘प.पू. डॉक्टर समवेत असून त्यांचे सर्वत्र लक्ष आहे’, याची आलेली प्रचीती
१. डोंबिवलीहून कुडाळला जातांना तेथील एका साधकांनी खिशात २०० रुपये ठेवणे आणि ‘असे पैसे देणे चुकीचे आहे’, असे म्हटल्यावर त्यांनी पैसे संस्थेला अर्पण करण्यास सांगणे : वर्ष २००१ मध्ये मी कुडाळ येथील सेवाकेंद्रात साधनेसाठी आलो. नंतर एकदा मी एका वकिलांना भेटण्यासाठी कुडाळ येथून ठाणे आणि तेथील सेवाकेंद्रातून डोंबिवली येथे गेलो होतो. वकिलांची भेट झाल्यानंतर मी डोंबिवलीतील एका साधकाला भेटायला त्यांच्या घरी गेलो. त्याच रात्री रेल्वेने मला परत कुडाळ येथे जायचे होते. त्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकावर जातांना मी साधकाचा निरोप घेतला. तेव्हा त्यांनी बळेबळे माझ्या खिशात दोनशे रुपये ठेवले. सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारे पैसे देण्याची पद्धत नसल्याने मी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली आणि ते पैसे संस्थेला अर्पण करण्यास सांगितले. साधकाला त्यांची चूक लक्षात आली; परंतु त्या वेळी त्यांना ते पैसे परत घेणे प्रशस्त न वाटल्याने त्यांनी ‘तुम्हीच ते पैसे सेवाकेंद्रात अर्पण करा’, अशी मला विनंती केली.

२. ठाणे रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पैशांचे पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात येणे, त्या वेळी साधकांनी खिशात ठेवलेल्या २०० रुपयांतून तिकीट काढता येणे : ठाणे रेल्वेस्थानकावर आल्यानंतर माझ्या लक्षात आले की, ‘माझे पैशांचे पाकीट चोरीला गेले आहे.’ त्या पाकिटातच माझे तिकीट आणि माझ्याकडील सर्व पैसे होते. त्या काळी भ्रमणभाष नसल्याने अन्य कुणाला संपर्क करण्याची सोयही नव्हती. त्या साधकाने दिलेले २०० रुपये माझ्या सदर्याच्या वरच्या खिशात होते. त्या पैशांतूनच तिकीट काढून मी कुडाळ येथे पोचू शकलो. त्या वेळी मला त्या साधकाला बुद्धी देणारे गुरुदेवच आहेत’, हे लक्षात आले; कारण ठाण्यासारख्या अनोळखी शहरात पैशाअभावी माझी गैरसोय झाली असती. तेव्हा ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत आणि माझ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत’, याची मला प्रचीती आली.
– श्री. योगेश जलतारे

मला ज्ञात असलेल्या सनातन संस्थेच्या काही साधकांना आलेल्या गुरुदेवांच्या संदर्भातील अनुभूती !
प्रसंग १ : आपत्कालीन घटनेतून वाचवणे !
रेल्वेच्या भीषण अपघातातून वाचवून अकोल्यातील एका साधकाला प.पू. डॉक्टरांनी दिलेले जीवनदान !
१. अकोल्यातील एक साधक प.पू. डॉक्टरांच्या मुंबईतील निवासस्थानी सेवेसाठी येत असणे, एकदा सेवा करून ते गावी जाण्यासाठी सेवाकेंद्रातून गेल्यावर प.पू. डॉक्टरांनी त्यांची चौकशी करणे : संस्थेच्या आरंभीच्या काळात अकोला येथील एक साधक मधून मधून सेवेसाठी मुंबई येथील प.पू. डॉक्टरांच्या निवासस्थानी असलेल्या सेवाकेंद्रात जात असत. एकदा सेवा झाल्यानंतर ते अकोला येथे जाण्यास निघाले. त्या वेळी प.पू. डॉक्टर अन्य एका सेवेत व्यस्त होते. थोड्या वेळाने बाहेर येऊन प.पू. डॉक्टरांनी तेथील साधकांना अकोल्यातील साधकाविषयी विचारले आणि ‘ते गेले का ?’ हे पहाण्यास सांगितले. साधकांनी रस्त्यावर जाऊन बघितले असता ते साधक ऑटोरिक्शाने नुकतेच निघालेले दिसले. ते पाहून साधकांनी प.पू. डॉक्टरांना तसे सांगितले.

२. रेल्वेस्थानकावर साधकाची मेव्हण्याशी भेट होऊन त्यांनी ‘तुम्हाला डॉ. आठवले अन्य फलाटावर शोधत आहेत’, असे सांगणे आणि साधक प.पू. डॉक्टरांना शोधत असता रेल्वे निघून जाणे : काही वेळाने ते साधक रेल्वेस्थानकावर पोचले आणि त्यांच्या रेल्वेच्या फलाटावर जाण्यास निघाले. तेव्हा वाटेत त्यांना कल्याण येथे रहाणारे त्यांचे मेहुणे भेटले आणि त्यांनी साधकाला सांगितले, ‘तुमचे डॉ. आठवले तुम्हाला दुसर्या फलाटाकडे शोधत आहेत.’ हे ऐकल्यावर त्या साधकाने क्षणाचाही विलंब न करता त्या फलाटाकडे धाव घेतली आणि प.पू. डॉक्टरांचा शोध चालू केला. तेवढ्या वेळेत त्या साधकाची रेल्वे चुकली. त्यामुळे नाईलाजाने त्यांना कल्याण येथे मेव्हण्याकडे रहायला जावे लागले. साधकांचे मेहुणे त्यांना निरोप देऊन आधीच घरी रवाना झाले होते.
३. साधक मेव्हण्यांच्या घरी गेल्यावर त्यांना आणि त्यांचे बोलणे ऐकून साधकाला आश्चर्य वाटणे आणि दुसर्या दिवशी रेल्वेच्या अपघाताविषयी कळल्यावर ‘प.पू. डॉक्टरांनी वाचवले’, याची जाणीव होणे : साधक मेव्हण्याच्या घरी पोचताच त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण त्यांच्या माहितीप्रमाणे साधक अकोल्याला जाणार होते. साधकाने त्यांना थोड्या वेळापूर्वीचे रेल्वेस्थानकावरील इतिवृत्त सांगताच मेहुणे म्हणाले, ‘‘मी तुम्हाला भेटलोच नाही. मी आज कल्याण सोडून अन्य कुठेही गेलो नाही.’’ तेव्हा साधकाला पुष्कळ आश्चर्य वाटले. रेल्वे चुकल्यामुळे आणि अन्य पर्याय नसल्याने त्यांनी तेथे मुक्काम केला.
दुसर्या दिवशी साधकाला कळले की, ‘ते ज्या रेल्वेने प्रवास करणार होते, त्या गाडीला भुसावळजवळ भीषण अपघात झाला होता. ज्या डब्यात त्या साधकाचे आरक्षण होते, तो डबा पूर्ण चेपला गेला होता. तेव्हा साधकाला सर्व प्रसंगांमागील कार्यकारणभाव लक्षात आला आणि ‘प.पू. डॉक्टरांनीच या अपघातातून वाचवले आहे’, याची त्याला जाणीव झाली.
– श्री. योगेश जलतारे

प्रसंग २ : सूक्ष्मातील अस्तित्वातून आधार बनणे !
छत्रपती संभाजीनगर येथील साधक अत्यवस्थ स्थितीत अतीदक्षता विभागात असतांना त्याला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सतत समवेत असल्याची आलेली प्रचीती
१. अर्धांगवायूचा झटका आल्याने एका साधकाला रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करावे लागणे आणि कोरोनामुळे कुटुंबियांना रुग्णासमवेत रहाता न येणे : वर्ष २०२० – २०२१ मध्ये छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील एक साधक अर्धांगवायूचा झटका आल्याने आजारी पडले. नंतर त्या साधकाची परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. तो काळ कोरोना महामारीचा होता. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात तुडुंब गर्दी आणि खाटांची वानवा, अशी स्थिती होती. कुटुंबियांना रुग्णालयात रुग्णासमवेत रहाण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्या साधकाचे कुटुंबीय रुग्णालयाच्या पायर्यांवरच झोपत असत आणि रुग्णालयाच्या दारातच कुटुंबियांचे तेथील आधुनिक वैद्यांशी बोलणे होत असे. अशा प्रकारे जवळजवळ ३ – ४ मास ते साधक अतीदक्षता विभागात होते.
२. आधुनिक वैद्यांनी रुग्ण-साधक ‘प.पू. डॉक्टर, मला क्षमा करा’, असे म्हणत असल्याचे सांगून ‘प.पू. डॉक्टर कोण आहेत ?’, असे विचारणे : बरे वाटल्यानंतर साधकाला घरी सोडण्यात आले. तेव्हा त्यांच्या प्रकृतीविषयी आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘अशा रुग्णांना प्रचंड वेदना होत असतात. त्यामुळे ते किंचाळतात. काही जण नाका-तोंडातील नळ्या काढून फेकून देतात. त्यामुळे काही वेळा त्यांना बांधूनही ठेवावे लागते; परंतु हा रुग्ण (साधक) केवळ ‘प.पू. डॉक्टर, मला क्षमा करा. मी परत अशी चूक करणार नाही’, असे म्हणत होता.’’ आधुनिक वैद्यांनी न रहावून नातेवाइकांना विचारले, ‘‘हे प.पू. डॉक्टर कोण आहेत ?’’ तेव्हा नातेवाइकांनी सांगितले की, ‘ते आमचे गुरु आहेत !’
३. आजारपणातून बाहेर आल्यावर साधकाने ‘आजारपणात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सतत समवेत असल्याने ‘मला कोणताच त्रास होत नव्हता’, असे सांगणे : आजारपणातून बाहेर आल्यावर त्या साधकाने अनुभूती सांगितली, ‘‘आजारपणाच्या संपूर्ण काळात मला कसलीही जाणीव होत नव्हती आणि मला कोणता त्रासही होत नव्हता. मला केवळ इतकेच आठवते की, ‘मी प.पू. डॉक्टरांच्या समवेत होतो. त्यांच्याशी माझा अखंड संवाद होत होता. प.पू. डॉक्टर मला माझ्या आणि सहसाधकांच्या समष्टी सेवेतील चुका सांगत होते. त्या चुकांसाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी क्षमायाचना करत होतो. इतकेच मला आठवते.’’ प्रत्यक्षात संबंधित साधकाचे आजारपण हे जीवघेणे होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांना त्या आजारातून बाहेर काढलेच आणि आजारपणात सतत त्यांच्या समवेत राहून त्यांना वेदनांची जाणीवही होऊ दिली नाही. गुरुमाऊलींनी एका साधकासाठी याहून अधिक काय करावे ?
– श्री. योगेश जलतारे

अध्यात्मात योगायोग नसतात, तर ती गुरुकृपाच असते !
लेखातील साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती वाचतांना सकृत्दर्शनी त्या चमत्कारसदृश वाटू शकतात किंवा काही बुद्धीजीवी या घटनांना ‘योगायोग’ असेही म्हणतील; परंतु अध्यात्मशास्त्रानुसार ‘योगायोग’ असे काही नसते. ज्यांची ईश्वर किंवा आपले गुरु यांच्यावर श्रद्धा असते, त्यांच्यासाठी ‘देव स्वतः किंवा इतरांच्या माध्यमातून कसा धावून जातो’, याची ही उदाहरणे आहेत. ही उदाहरणे आपल्याला बुद्धीअगम्य वाटू शकतील; परंतु या सर्व घटना वास्तवात घडलेल्या आहेत.
साधकांनी येणार्या आपत्काळाचे भय न बाळगता श्रद्धेने साधना करावी !
वरील अनुभूती वाचल्यानंतर ‘देव आणि गुरु आपले श्रद्धाळू साधक, तसेच भक्त यांची कशी काळजी वहातात’, हे वाचकांच्या निश्चितच लक्षात आले असेल ! आपणही श्रद्धेने साधना करत राहिलो, तर देव युद्धजन्य काळातही आपल्यासाठी धावून नाही का येणार ? त्यामुळे साधकांनी येणार्या आपत्काळाचे भय न बाळगता श्रद्धेने साधना करावी. या अनुभूतींवरून ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हे संत तुकाराम महाराज यांचे वचन ‘किती सार्थ आहे’, हे लक्षात येते. या अनुभूतींसाठी देवता, गुरु आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
– श्री. योगेश जलतारे
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !