आता बंगालची जनता निर्भयपणे जगेल ! – Vivek Ranjan Agnihotri, Filmmaker

बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचे प्रकरण

विवेक रंजन अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

मुंबई – बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर बोलतांना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटांचे निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, ‘बंगालमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चित्रपटगृहांमधून दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. तेव्हा आमच्यावर आक्रमणे झाली आणि मारामारीही झाली.

माझ्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या. ममता बॅनर्जी यांनी मला बंगालमध्ये बंदी घातली होती. त्यामुळे मला बंगालमध्ये जाण्याची अनुमती मिळाली नाही आणि मी राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यात जाऊ शकलो नाही; पण आता निवडणुकीच्या निकालानंतर बंगालची जनता निर्भयपणे जगेल.

मला आनंद आहे की,

आम्ही पराभव मानला नाही. निवडणुकीच्या काळात आम्ही ‘द बंगाल फाइल्स’ अधिकाधिक लोकांपर्यंत (लपून) पोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या पद्धतीने लढा चालू ठेवला. शेवटी हा मोठा विजय मिळाला. बंगालच्या महान लोकांना अभिनंदन. आता तुम्ही निर्भयपणे मान उंचावून चालू शकता.’’

संपादकीय भूमिका

बंगालप्रमाणे देशातील सर्वच राज्यांतील नागरिकांना निर्भयपणे जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !