शिरोली पुलाची (कोल्हापूर) येथे धर्मांधांनी हिंदु युवतींचे ‘व्हिडिओ’ प्रसारित केल्याचे प्रकरण !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांनी हिंदु युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरात मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाचा प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात समाप्त झाला. या मोर्चात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सागर कुराडे, शिवसेनेचे श्री. संजय सकपाळ, भाजपचे श्री. प्रीतम कापसे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर, श्रीराम सेनेचे श्री. अमोल कोरवी, भाजपचे श्री. राजेंद्र तारळे, श्री. महेश कोरी, श्री. संदीप नाथबुवा, बजरंग दलाचे दक्षिण विभाग जिल्हामंत्री श्री. विश्वनाथ पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुदर्शन चव्हाण यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी त्यांच्या भाषणांमधून शिरोली येथील प्रकरणाचा निषेध नोंदवत या प्रकरणी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
मोर्चा झाल्यावर प्रांत कार्यालयात संबंधित अधिकार्यांना, तसेच पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले. या मोर्चात बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना, श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष
‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ मोर्चात सहभागी झालेल्यांनी जागृती करणारे विविध फलक हातात घेतले होते.
पन्हाळा ते पावनखिंड ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेस प्रारंभ !
सनातनचा युवा साधक यदुनंदन अजिंक्य वरेकर गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार